रामदास कदमांचा नगर महापौर निवडणुकीबबात गौप्यस्फोट

मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अहमदनगर महापौर निवडणुकीबाबत गौप्यस्फोट केला आहे.”अहमदनगर प्रकरणाबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोललो होतो. नगर महापौर निवडणुकीत सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे पुन्हा एकदा दिसून […]

रामदास कदमांचा नगर महापौर निवडणुकीबबात गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अहमदनगर महापौर निवडणुकीबाबत गौप्यस्फोट केला आहे.”अहमदनगर प्रकरणाबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोललो होतो. नगर महापौर निवडणुकीत सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे पुन्हा एकदा दिसून आलं, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला.

विधानसभा निवडणूक निकाल लागण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला होता. आम्ही सत्तेततून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी जागा घेईल अशी भीती आम्हाला वाटत आहे. हे नगरनिमिताने पुन्हा एकदा  शिक्कामोर्तब झाले की राष्ट्रवादी भाजपाबरोबर आहे, पुन्हा एकदा भाजपाने राष्ट्रवादीबरोबर युती केली. त्यावरुन राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आहेत, हे पुन्हा एकदा उघड झाल्याचं रामदास कदम म्हणाले.

नवाब मलिक यांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर दिलं. “शिवसेनेचे मंत्री रामदास कदम सांगतयेत की राष्ट्रवादीने भाजपचा मुक्का घेतला. पण शिवसेनेचा संसार भाजप सोबत नीट चालत नाही आणि तुम्ही दुसऱ्यांचे मुक्के पाहता. नगरमध्ये ज्यांनी अनैतिक मुक्के घेतले आहेत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल. पण भाजपसोबत तुमचा संसार नीट चालेल की नाही, घटस्फोट होईल का?याची उत्तरे जनतेला द्या”, असं नवाब मलिक म्हणाले.

नगरमध्ये भाजपचा महापौर

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.

संबंधित बातम्या 

अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर  

राज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.