अहमदनगर महापौर निवडणूक : बहुमतासाठी 34 चा आकडा, 23 नगरसेवकांसह शिवसेना म्हणते महापौर आमचाच होणार

अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत. (Ahmednagar Mayor Election Shivsena)

अहमदनगर महापौर निवडणूक : बहुमतासाठी 34 चा आकडा, 23 नगरसेवकांसह शिवसेना म्हणते महापौर आमचाच होणार
अहमदनगर महापालिका
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 12:42 PM

अहमदनगर : अहमदनगरच्या महापौर पदाची मुदत संपत आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अहमदनगरमध्ये यावेळी शिवसेनेचाच महापौर होणार, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. (Ahmednagar Mayor Election Shivsena claims Victory)

अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव

अहमदनगरच्या महापौर पदाची मुदत 30 जूनला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी नगरच्या महापौर पदाबाबत समीकरणं जुळवण्यावरुन, महापौरपदाच्या उमेदवारीवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर झाला होता, मात्र यावेळी शिवसेनेचाच महापौर होणार असा दावा पक्षाने केला आहे.

महाविकास आघाडी जुळणार का?

अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष आहे. यंदा महापौर पदासाठी राज्यातील महाविकास आघाडी प्रमाणे नगरमध्ये सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार की नवीन समीकरणे पाहायला मिळणार याची उत्सुकता लागलीय आहे.

अहमदनगरच्या सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन चर्चा केली. त्यात संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, माजी महापौर भगवान फुलसौदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजीराजे कदम, मा सभागृह नेते अनिल शिंदे, शिवसेना गट नेते संजय शेंडगे हे उपस्थित होते.

महापौर पदासाठी उमेदवार

रोहिणी शेंडगे- शिवसेना

रिता भाकरे- शिवसेना

शीला चव्हाण- काँगेस

रोहिणी पागीरे- राष्ट्रवादी

तर भाजपकडे उमेदवार नाही

अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2

2018 मध्ये अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत काय घडलं होतं?

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत 2018 मध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले होते. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली होती. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं होतं. कारण भाजपवासी सासरे शिवाजी कर्डिलेंना राष्ट्रवादीवासी जावई संग्राम जगताप यांनी मदत केली होती.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

अहमदनगर महापालिकेत ट्विस्ट, सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेचा शड्डू

(Ahmednagar Mayor Election Shivsena claims Victory)

Non Stop LIVE Update
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.