माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 12, 2020 | 11:50 PM

पुणे : जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे (Ajit Pawar and Malegaon Sugar Factory Election). 2015 मध्ये अजित पवारांच्या पॅनलला तावरे गटाकडून पराभवाची चव चाखावी लागली होती. 5 वर्ष सत्ता केल्यानंतर तावरे कंपनीने पुन्हा एकदा अजित पवारांसमोर आव्हान उभं केलं आहे.

पुणे जिल्हा आणि बारामतीचे राजकारण ज्या सहकारी साखर कारखान्यांभोवती फिरतंय त्या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक यंदा चांगलीच गाजणार आहे. अजित पवारांचा निळकंठेश्वर, तर चंद्रराव तावरे आणि विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांचा सहकार शेतकरी बचाव पॅनल यांच्यात यावेळीही तुल्यबळ लढत होणार आहे. अजित पवारांपुढे तावरेंच्या पॅनलनं पुन्हा एकदा 2015 प्रमाणे आव्हान उभं केलंय.

दुसरीकडे मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलही निवडणुकीसाठी सज्ज झालाय. आज (12 फेब्रुवारी) या दोन्ही पॅनलकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. 5 वर्षात तावरेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाने केलेला सत्तेचा गैरवापर आम्ही लोकांपुढे मांडणार असल्याचं निळकंठेश्वर पॅनल समर्थकांचं म्हणणं आहे.

एकूण 301 पैकी 245 जणांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. त्यामुळे 56 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 42 जण दोन्ही पॅनेलचे, तर 14 जण अपक्ष आहेत. त्यामुळे या अपक्षांचा फटका नेमका कुणाला बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र 2015 च्या तुलनेत यंदा माळेगाव कारखान्याची निवडणूक दोन्ही पॅनलसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे या सहकाराच्या निवडणूक रिंगणात कोण बाजी मारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ajit Pawar and Malegaon Sugar Factory Election

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें