सोमय्या म्हणाले, जरंडेश्वरचा मालक कोण ते सांगा?; अजित पवारांनी कुंडलीच मांडली

जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण? असा सवाल करत या कारखान्याच्या मालकाचं नाव जाहीर करण्याचं आवाहन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं होतं. (ajit pawar clarification on jarandeshwar sugar mill)

सोमय्या म्हणाले, जरंडेश्वरचा मालक कोण ते सांगा?; अजित पवारांनी कुंडलीच मांडली
ajit pawar

पुणे: जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण? असा सवाल करत या कारखान्याच्या मालकाचं नाव जाहीर करण्याचं आवाहन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं होतं. त्यावर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरंडेश्वर कारखान्याची कुंडलीच मांडली. त्यावर आता सोमय्या काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी मारल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याची कुंडली मांडली. हनुमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर सुगर मिल काढली. त्यांचं कुटुंब त्यात होतं. त्यांना त्या वर्षी तोटा आला. त्यामुळे त्यांनी तो कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवायला दिला. तो कारखाना दुसरी कंपनी चालवत आहेत. सुंदरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने जरंडेश्वरच्या लिलावाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

मातीमोल भावाने विकले कसे म्हणता?

अजित पवार यांनी कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला आणि तो कुणी घेतला याची यादीच आज जाहीर केली. अनेक कारखाने स्वत: सरकारनेच 3 ते 5 कोटी विकल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून देत साखर कारखाने आम्ही मातीमोल भावाने विकले कसे म्हणता? असा सवालही केला.

अनेक चौकश्या झाल्या काहीच निष्पन्न नाही

महाराष्ट्रातील साखर कारखानदारी बद्दल खूप काही बोललं गेलं. खूप बातम्या आल्या. या गोष्टीला 12 ते 15 वर्ष झाले या बातम्या येत असताना मी उत्तर देत नव्हतो. पण आता अतिरेक झाला आहे म्हणून उत्तर देत आहे. त्याकाळात 25 हजार कोटी, काहींनी 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नवीन सरकार आलं त्यांनी सीआयडीला चौकशी करायला लावली. त्यात काही निष्पन्न झालं नाही. एसीबीने चौकशी केली. त्यातही स्पष्ट झालं नाही. सहकार विभागानेही चौकशी केली. त्यातही काही निष्पन्न झालं नाही, असं पवार यांनी सांगितलं.

अजितदादांची यादी

यावेळी अजित पवार यांनी राज्यातील किती साखर कारखाने विकले गेले आणि कुणी विकत घेतले याची यादीच पत्रकार परिषदेत जाहीर केली. 65 साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 64 सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतले. काही लोकांनी चालवायला घेतले तर काहींनी इतरांना चालवायला दिले. पण काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

PM Modi Speech LIVE | लसीकरणाने देशात मजबूत सुरक्षा कवच, नव्या भारताचं जगाला दर्शन, देशवासियांचं अभिनंदन : नरेंद्र मोदी

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

(ajit pawar clarification on jarandeshwar sugar mill)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI