नाशिक: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक मधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवार यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपसंदर्भात विचारलं असता ज्या आरोपीने पोलीस खात्यात असताना वातावरण खराब केलं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? सवाल त्यांनी उपस्थित केला.चंद्रकांत दादांकडे ज्यावेळेस महसूल मंत्री होते, तेव्हा तिथले आमदार राजेश क्षीरसागर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.दादांबद्दल त्यांनी खूप काही सांगितलं होतं. उद्या एखादा आरोपी आणखी कोणाचे नाव घेईल मग कसं चालेल? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. चंद्रकांत पाटील यांना काहीही सुचत नाही कुठल्या पक्षाच्या अधिवेशनात असे ठराव (अजित पवारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव) झाले असे बघितलं नाही. आरोपीनं दिलेल्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवायचं, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar gave answer to Chandrakant Patil demand of CBI enquiry)