नाशिक : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर गुरुवारी संध्याकाळी सोलापुरात दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचा आरोप पडळकर यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. दगडफेक करणाऱ्या तरुणाचे फोटोही आता व्हायरल होत आहेत. त्याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलंय. (Ajit Pawar’s reaction to the stone pelting on Gopichand Padalkar’s car)