Ajit Pawar Gadchiroli : ‘फुल्लफ्लेज्ड मंत्रिमंडळ आलं तरच…’ शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं का म्हणाले अजित पवार?

अजित पवार (Ajit Pawar) हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी आज गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याला भेट देऊन तेथील पूर (Floods) परिस्थितीची पहाणी केली.

Ajit Pawar Gadchiroli : 'फुल्लफ्लेज्ड मंत्रिमंडळ आलं तरच...' शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं का म्हणाले अजित पवार?
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 10:07 AM

गडचिरोली : अजित पवार (Ajit Pawar) हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी आज गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याला भेट देऊन तेथील पूर (Floods) परिस्थितीची पहाणी केली. पुराचा प्रचंड फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत झालेल्या नूकसानाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नव्या राज्य सरकारला देखील टोला लगावला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.  मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाही. एकालाही तातडीची मदत झालेली नाही. शेतकऱ्यांच्या नकुसानाचे पंचनामे देखील झाले नाहीत. या कामाला विलंब लागतोय कारण राज्यात सध्या केवळ दोघांचेच सरकार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सध्या गरज आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर कामे लवकर मार्गी लागतील. पालकमंत्र्यांच्या देखरेखीखाली पंचनामे करता येतील असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मदतीसाठी पाठपुरावा

पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, सध्या मुख्यमंत्री आणि  उपमुख्यमंत्री हेच कारभार पहात आहेत. मात्र फुलफ्लेज्ड मंत्रिमंडळ आलं तरच काम नीट होऊ शकते. या पहाणी दौऱ्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्येही जाणार आहे. पंचनाम्याबाबत त्यांना विचारणार आहे.  आठ दहा दिवस झाले तरी पंचनामे सुरू नाहीत, तर त्याचं कारण काय? जिल्हाधिकारी कार्यालयाकडे स्टाफ कमी आहे का, की शेतापर्यंत जाण्याची सोय नाहीये? असा सवालही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सरकार सांगते, मात्र इथे कोणाचेच पंचनामे नाहीत. साधाराण दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालंय या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार. पुरग्रस्तांना मदत मिळून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

पुराचा जिल्ह्याला मोठा फटका

गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाला. या पवासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. तब्बल 47 गावांना पुराचा फटका बसला आहे. जून पासून ते आतापर्यंत पावसामुळे झालेल्या विविध अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 76 पशूधन दगावले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.