हातावर ‘देवेंद्र’ नावाचा टॅटू, आता म्हणतात, अजित पवारांवरील कारवाईचा निषेध, नरेंद्र पाटलांच्या मनात काय?

जर यंत्रणेकडे योग्य पुरावे असतील तर या लोकांना घरात घुसून का अटक होत नाही? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केले. तर संबंधित विभागाकडून कारवाया योग्य पद्धतीने केल्या जात नसल्याने त्यांनी या कारवायांबाबत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू हातावर काढणाऱ्या नरेंद्र पाटलांच्या मनात आहे तरी काय? अशी चर्चा रंगली आहे.

हातावर 'देवेंद्र' नावाचा टॅटू, आता म्हणतात, अजित पवारांवरील कारवाईचा निषेध, नरेंद्र पाटलांच्या मनात काय?
अजित पवार, नरेंद्र पाटील
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 7:41 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. या छापेमारीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. तर भाजप नेते कर नाही तर डर कशाला असं म्हणत आहेत. अशावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या छापेमारीचा निषेध केलाय. देवेंद्र फडणवीस समर्थक असलेल्या नरेंद्र पाटलांनी अजित पवारांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. (Narendra Patil protests against the raid on Ajit Pawar by the Income Tax Department)

राज्यातील काही लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. काही पुरावे सापडले आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या कारवाया फक्त दिखावा आहे का? असा सवाल राज्यातील जनतेला पडला आहे. जर यंत्रणेकडे योग्य पुरावे असतील तर या लोकांना घरात घुसून का अटक होत नाही? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केले. तर संबंधित विभागाकडून कारवाया योग्य पद्धतीने केल्या जात नसल्याने त्यांनी या कारवायांबाबत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू हातावर काढणाऱ्या नरेंद्र पाटलांच्या मनात आहे तरी काय? अशी चर्चा रंगली आहे.

‘पाहुणचार झाल्यानंतर मी बोलेन’

दरम्यान, आयकर विभागाच्या छापेमारीवर बोलताना अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केलीय. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना “पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी सगळं बोलेन. मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,” असे अजित पवार म्हणाले.

नरेंद्र पाटलांच्या हातावर ‘देवेंद्र’चा टॅटू

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटावर देवेन्द्र हे नाव कोरले आहे. विरोधीपक्ष नेते “देवेन्द्र फडणवीस” यांचंच हे नाव कोरलं आहे, असं नरेंद्र पाटलांनी स्पष्ट केलं. “त्याचं कारण म्हणजे एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की नरेंद्र पाटील हे आमच्या मनात आहेत आणि म्हणून देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलं आहे. आणि याचा मला आनंद आहे. मला खूप बरं वाटतंय कारण ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत” अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.

फडणवीस म्हणतात, हृदयात फक्त प्राची वहिनींना ठेवा!

नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचं अध्यक्ष बनवणं हा माझा स्वार्थ होता. अण्णासाहेब पाटील महामंडळला पैसे दिले होते आणि नरेंद्र पाटील यांनीच ते काम करावं आणि मराठा समाजला उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी माझी धारणा होती. त्यामुळेच त्यांना अध्यक्ष केलं. नरेंद्रजी तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशिर्वादात ठेवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

काल बहिष्कार, आज नाव टाळलं, फडणवीस म्हणतात, ही तर कोकणासाठी मोदींची भेट

‘देवेंद्रजींना बोलावल नाही, राज्यपालांना विमानातून उतरवल तितच यांचा कोतेपणा दिसतो’, भातखळकरांचा टोला

Narendra Patil protests against the raid on Ajit Pawar by the Income Tax Department

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.