AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : अजित पवार बंड करणार हे शरद पवार यांना आधीच माहीत होतं?, अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, मी शुक्रवारीच…

Ajit Pawar, Maharashtra Minister Oath Taking Ceremony : शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्हावर दावा केला आहे.

Ajit Pawar : अजित पवार बंड करणार हे शरद पवार यांना आधीच माहीत होतं?, अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, मी शुक्रवारीच...
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2023 | 4:13 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. 40 आमदारांना घेऊन अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणेच बदलली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यावरून अजित पवार हे बंड करणार होते हे आधीच शरद पवार यांना माहीत असल्याचं उघड होत आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, असं अजित पवार यांनी सांगितलं. म्हणजे अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं शरद पवार यांना माहीत होतं आणि अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये जाणार असल्याचंही पवार यांना माहीत होतं, असं जाणकारांचं म्हणणं आहे. जर अजित पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याचं शरद पवार यांना माहीत होतं तर पवार यांनी अजितदादांचं बंड का मोडून काढलं नाही? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

पक्ष आणि चिन्हावर दावा

अजित पवार यांनी आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झाल्याचं स्पष्ट केलं. आम्ही आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या नावाने आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच भाजपसोबत जाण्याबाबत आमच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर त्याला मूर्त स्वरुप आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर…

शिवसेनेला जातीयवादी म्हणून संबोधलं जात होतं. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि आम्ही गेलो. जर ज्या पक्षाला जातीयवादी म्हटलं जातं त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो तर मग भाजपसोबत जाण्यात काय अडचण आहे?, असा सवाल अजित पवार यांनी केला. आम्ही नागालँडमध्ये भाजपसोबत गेलो आहोत. मग महाराष्ट्रात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत का जाऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.

खासदार आणि आमदार आमच्यासोबत

आज काही जण पोहोचू शकले नाहीत. काहीजण परदेशात आहे. विशेषत: मी लोकप्रतिनिधींविषयी बोलतो. त्यांच्याशी मी संपर्क साधलाय. त्यांनी मान्यता दिली आहे. काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आमच्यासोबत जास्तीत जास्त आमदार आणि खासदार आहेत, असा दावाही त्यांनी केला.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.