जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, ED ची कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांनी काय सांगितलं?

योगेश बोरसे

| Edited By: |

Updated on: Jul 02, 2021 | 2:04 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं केलेल्या कारवाई संदर्भात भूमिका स्पष्ट केली. Jarandeshwar Sugar Mill

जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, ED ची कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांनी काय सांगितलं?
ajit pawar

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं केलेल्या कारवाई संदर्भात भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सुंदरबाग सोसायटीने याचिका दाखल केली होती. 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. सर्व रीतसर परवानग्या घेतल्या होत्या, माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाहीय, सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जाऊ, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar said ED taken action on Jarandeshwar Sugar Mill regarding Guru Commodities)

ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी

ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी चालवली आहे. त्यामुळे जरंडेश्वर कारखान्यावर टाच आणली आहे. मात्र, सध्या जरंडेश्वर शुगर मिल कंपनी कारखाना चालवते. सीआयडी, एसीबीनं चौकशी केली त्यामध्ये काहीही समोर आलं नाही. ईओडब्ल्यूकडून चौकशी सुरु आहे. ती चौकशी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात आरोप करण्यात आले होते पण त्यासंदर्भात पॉझिटिव्ह निकाल आले आहेत.

बीव्हीजीनं जरंडेश्वर शुगर मिलची स्थापना केली

जरंडेश्वर शुगर मिल या संदर्भात योग्य ठिकाणी दाद मागेल. ऊस उत्पादक शेतकरी,हजारो कामगार, जरंडेश्वरचं व्यवस्थापन वकिलांमार्फत योग्य ठिकाणी दाद मागेल, असं अजित पवार यांनी सांगितलं. गायकवाड आणि माने यांच्या बीव्हीजी ग्रुपनं जरंडेश्वर शुगर मिलची स्थापना केली. बीव्हीजीला पहिल्या वर्षी तोटा झाल्यानं त्यांनी कारखाना राजेंद्र घाडगे यांच्याकडे दिला.  कारखान्याचे  व्यवहार आणि रेकॉर्ड चांगलं असल्याशिवाय बँका कर्ज देत नाहीत.  जरंडेश्वर शुगर मिलच्या डायरेक्टरना ईडीनं बोलावलं त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. पीडीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांना ईडीनं बोलावलं त्यावेळी त्यांनीही माहिती दिली. पीडीसीसी बँकेला कारखान्याच्यावतीनं 65 कोटींचा हप्ता द्यावा लागतो.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना त्यांनी राजकीय नेत्यांना मंत्री असताना त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं कंपन्यांमध्ये संचालक राहू नयेत, म्हणून कंपनीतून राजीनामा दिला, असं अजित पवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

ED ची कारवाई सुरु, अजित पवारांच्या मामाचा साखर कारखाना जप्त

आधी व्हीप, आता थेट कॉल, महाविकास आघाडीच्या आमदारांशी संपर्क, अधिवेशनापूर्वी हालचाली वाढल्या

(Ajit Pawar said ED taken action on Jarandeshwar Sugar Mill regarding Guru Commodities)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI