काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नको? : अजित पवार

पुणे : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे युत्या-आघाड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्रात सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी महत्त्वाच्या भूमिकेत असले, तरी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे …

काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नको? : अजित पवार

पुणे : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे युत्या-आघाड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्रात सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी महत्त्वाच्या भूमिकेत असले, तरी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलणी सुरु आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. मात्र, दुसरीकडे, राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. या विरोधाचं कारण म्हणजे, उत्तर भारतात काँग्रेसला फटका बसू शकतो. मात्र, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “काँग्रेसने ताठर भूमिका घेऊ नये. काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नको?”

महाआघाडीत जायचं की नको? या सहा मुद्द्यांवर मनसे अजूनही संभ्रमात

अजित पवार यांनी याआधीही राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात अजित पवारांनी राज ठाकरेंशी चर्चा केली होती. किंबहुना, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत. मात्र, काँग्रेसने मनसेला सोबत घेण्यास सातत्याने विरोध केला आहे. उत्तर भारतात काँग्रेसला फटका बसेल, असा काँग्रेसचा दावा आहे.

अजित पवारांना मनसे सोबत हवीय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मात्र विरोध!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आघाडीत जाण्यासंदर्भात अद्याप काहीच भूमिका मांडली नाही. किंबहुना, लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसेची रणनीती काय असेल, याबाबताही राज ठाकरे अद्याप जाहीर बोलले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचं या सर्व गोष्टींवरील एकंदरीत मौन आणि त्यात राष्ट्रवादीकडून मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात होणारे प्रयत्न, यातून येत्या काळात नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या ‘राज’भेटीनंतर ‘कृष्णकुंज’वरील हालचाली वाढल्या!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *