AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला, काँग्रेसच्या अंकिता पाटीलही उपस्थित

हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात. (Parth Pawar meets Harshvardhan Patil )

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला, काँग्रेसच्या अंकिता पाटीलही उपस्थित
इंदापुरात पार्थ पवारांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेतली
| Updated on: Mar 30, 2021 | 7:48 AM
Share

इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात. (Ajit Pawar Son Parth Pawar meets BJP Leader Harshvardhan Patil Daughter Ankita Patil)

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा (माई) अरुणराव पाटील यांचे निधन झाले. 18 मार्च 2021 रोजी अल्पशा आजाराने अनुराधा पाटील यांची प्राणज्योत मालवली. या पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.

पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आणि पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

पार्थ पवार यांचा परिचय

पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता.

हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपात

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्याने पाहिला होता. लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही, राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा आपल्याला सोडली नाही, असा आरोप करत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्ष सोडताना त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड केली होती. मात्र इंदापुरात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवूनही हर्षवर्धन पाटलांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला. (Ajit Pawar Son Parth Pawar meets BJP Leader Harshvardhan Patil Daughter Ankita Patil)

कोण आहेत अंकिता पाटील?

अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या  संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली

संबंधित बातम्या :

वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना

कट्टर विरोधक अजित पवारांशी अर्धा तास गप्पा, हर्षवर्धन पाटील म्हणतात…

(Ajit Pawar Son Parth Pawar meets BJP Leader Harshvardhan Patil Daughter Ankita Patil)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.