पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता संबंधितांना जागेवर खडसावणं ही अजित पवारांची पद्धत अनेकदा पहायला मिळालीय. आजही बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.