AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज 7 जण शपथ घेतील, मी नाही, भाजपबाबत खोदून-खोदून विचारु नका : अजित पवार

मी नाराज नाही, मी शपथविधीला जाणार आहे, मी सुप्रिया सुळे यांना घेऊन शपथविधीला जाणार आहे, मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार, शरद पवारच आमचे नेते आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं.

आज 7 जण शपथ घेतील, मी नाही, भाजपबाबत खोदून-खोदून विचारु नका  : अजित पवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 28, 2019 | 4:15 PM
Share

मुंबई : “मी आज शपथ घेणार नाही, आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील, त्याशिवाय राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेतील, काँग्रेसकडून कोण शपथ घेणार माहीत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, मुख्यमंत्री आणि 6 जण आज शपथ घेतील”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार (Ajit Pawar on Oath) यांनी दिली. (Ajit Pawar on Oath)  अजित पवार यांनी एक्स्क्लुझिव्ह टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

मी नाराज नाही, मी शपथविधीला जाणार आहे, मी सुप्रिया सुळे यांना घेऊन शपथविधीला जाणार आहे, मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार, शरद पवारच आमचे नेते आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं.

मी भाजपसोबत का गेलो होतो त्याबद्दल मी योग्य वेळ आल्यावर बोलेन. आज मी त्याबद्दल काही बोलणार नाही, असं अजित पवार म्हणाले. भाजपसोबत का गेलो हे मला खोदून खोदून विचारु नका, मी योग्य वेळ आल्यावर बोलेन हे यापूर्वीच सांगितलं आहे. असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या संदर्भातील सगळा निर्णय शरद पवारसाहेबांचा आहे. मी 4.30 वाजता शपथविधीसाठी निघेन. सुप्रिया आणि मी शपथविधीला जाणार आहे. हा शपथविधी झाल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर बाकीचं मंत्रिमंडळातील स्थान यावर निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितलं.

काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत नक्की माहिती नाही. उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही अंतिम निर्णय नाही. शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्याबाबत प्राथमिक प्रयत्न असेल. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद अशी चर्चा सध्या माझ्या कानावर नाही. कानावर आलं की तुम्हाला सांगेन, असं अजित पवार म्हणाले.

भाजपशी हातमिळवणीबाबत मला वाटतंय तोपर्यंत अवाक्षरही काढणार नाही. चांगलं घडत असताना त्यावर बोलणं मला उचित वाटत नाही सरकार शेवटपर्यंत टिकावं असा प्रयत्न सगळे मंत्री, आमदार आणि मुख्यमंत्र्यांचा असतो, असं अजित पवारांनी सांगितलं.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली