5

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर भेटीत काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रेंचा भाजप प्रवेश ठरला?

अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत आपण काँग्रेसमध्ये समाधानी नसल्याचं सांगत भाजपमध्ये जाण्याची अप्रत्यक्षपणे घोषणा केली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर भेटीत काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रेंचा भाजप प्रवेश ठरला?
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 3:32 PM

सोलापूर : काँगेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. आता आणखी एक काँग्रेसचा आमदार भाजपच्या गळाला लागण्याची  दाट शक्यता आहे. अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत आपण काँग्रेसमध्ये समाधानी नसल्याचं सांगत भाजपमध्ये जाण्याची अप्रत्यक्षपणे घोषणा केली आहे.

आषाढीवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर म्हेत्रे (Siddharam Mhetre) हे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. म्हेत्रे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली होती. त्यामुळे म्हेत्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आपण काँग्रेसमध्ये समाधानी नसल्याचं म्हेत्रे यांनी सांगितलं. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी म्हेत्रे यांना भाजप प्रवेशासाठी आग्रह धरला आहे. मला निवडून आणणारी जनता हीच खरी मालक असून त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यांचा मला विचार करावा लागेल असं सिद्धाराम म्हेत्रे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोलापुरात उरल्या सुरल्या काँग्रेसला खिंडार पडणार आहे.

कोण आहेत सिद्धराम म्हेत्रे?

  • सिद्धाराम म्हेत्रे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्रीपद भूषवलं
  • सिद्धराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत
  • सोलापूरच्या राजकारणात सिद्धराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे.
  • सिद्धराम म्हेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.
  • सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत
Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..