मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी तपासून लवकरच घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय

मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर नुकतंच सर्वपक्षीय बैठक पार पडली. (CM Uddhav Thackeray All Party Meeting  on Maratha Reservation Issue)

मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी तपासून लवकरच घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय नेत्यांच्या  बैठकीत निर्णय
Follow us
| Updated on: Sep 17, 2020 | 7:19 AM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर नुकतंच सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत पुढच्या न्यायालयीन लढाईवर चर्चा झाली. न्यायालयीन लढाई संपेपर्यंत काय दिलासा द्यायचा. त्यावर चर्चा झाली. लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठकडे जाणार, अशी माहिती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. (CM Uddhav Thackeray All Party Meeting  on Maratha Reservation Issue)

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थितीत होते.

“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेत्यांनी मला वचनं दिलं आहे. पुढच्या न्यायालयीन लढाईवर चर्चा झाली. न्यायालयीन लढाई संपेपर्यंत काय दिलासा द्यायचा, त्यावरही या बैठकीत चर्चा झाली.”

“सर्वोच्च न्यायलयातील याचिका घटनापीठाकडे पाठवताना अनपेक्षितपणे आरक्षणाला स्थगिती दिली. आज विरोधी पक्षनेत्यांनी आपण सरकारसोबत आहोत असं आश्वासन दिलं आहे. यात कोणतंही राजकारण नाही. सर्व पक्ष एकत्र आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“यावर पर्याय कोणता, त्यावर मी नंतर बोलणार आहे. आरक्षणावर स्थगिती असताना मराठा विद्यार्थींना काय दिलासा द्यायचा याबाबत चर्चा झाली. आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली. इतर घटकांशीही चर्चा करायची आहे,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“मराठा समाजाने आंदोलन करु नका. मी पुन्हा आवाहन करतो. आधीच्या सरकारची टीम जशीच्या तशी आहे. मराठा समाजासाठी उद्या आणि परवा मोठ्या घोषणा करण्यात येतील.  विरोधी पक्ष आणि सरकार यांचे याबाबत एकमत झालं आहे. मराठा समाजाचं सरकार ऐकतंय तेव्हा आंदोलनाची गरज नाही. आम्ही सर्व तुमच्यासोबत, आंदोलन करू नका,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही सरकारसोबत, कुठलंही राजकारण आणणार नाही – देवेंद्र फडणवीस 

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकारबरोबर आहोत. यात कुठलंही राजकारण आणणार नाही. राज्य सरकारने तीन पर्याय विचार करते आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतो आहे. यात कुठलंही राजकारण आणणार नाही, असे फडणवीस म्हणाले. (CM Uddhav Thackeray All Party Meeting  on Maratha Reservation Issue)

संबंधित बातम्या :

सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.