AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकालाआधीच हा पक्ष एनडीएची साथ सोडण्याच्या तयारीत

इंफाळ, मणिपूर : लोकसभा निकालापूर्वीच भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएमध्ये प्रादेशिक स्तरावर धुसफूस असल्याचं दिसतंय. भाजप आमचे विचार आणि मतांना किंमत देत नसल्याची तक्रार नागा पीपल्स फ्रंट या पक्षाने केली आहे. मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील युतीमध्ये रहायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एनपीएफने शनिवारी बैठक बोलावली आहे. दुसरीकडे मित्र पक्षाने केलेला हा आरोप भाजपने फेटाळलाय. भाजप आम्हाला तुच्छ […]

निकालाआधीच हा पक्ष एनडीएची साथ सोडण्याच्या तयारीत
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

इंफाळ, मणिपूर : लोकसभा निकालापूर्वीच भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएमध्ये प्रादेशिक स्तरावर धुसफूस असल्याचं दिसतंय. भाजप आमचे विचार आणि मतांना किंमत देत नसल्याची तक्रार नागा पीपल्स फ्रंट या पक्षाने केली आहे. मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील युतीमध्ये रहायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एनपीएफने शनिवारी बैठक बोलावली आहे. दुसरीकडे मित्र पक्षाने केलेला हा आरोप भाजपने फेटाळलाय. भाजप आम्हाला तुच्छ समजत असल्याचा आरोप एनपीएफचे प्रदेशाध्यक्ष अवांगबू नेवमई यांनी केला.

2016 मध्ये विविध पक्ष एकत्र येत मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केल्यापासून भाजपने कधीही या युतीच्या मूळ भावनेचा आदर केला नाही. अनेकदा त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांना मित्रपक्षाचा सहकारी मानण्यास नकारही दिला, असा आरोप एनपीएफने केलाय. 60 सदस्य असलेल्या मणिपूर विधानसभेत एनपीएफचे चार आमदार आहेत. या चारपैकी एका आमदाराला मंत्रीपद देण्यात आलंय. भाजपने मित्रपक्षांना दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप एनपीएफच्या प्रदेशाध्यक्षांनी केला.

एनपीएफने भाजपला नेहमी मोठा भाऊ मानलंय, पण त्यांनी कधीही या भावनेचा आदर केला नाही. आम्हाला योग्य तो सन्मान दिला जात नाही, असा आरोप नेवमई यांनी केला. भाजपनेही एनपीएफचे आरोप फेटाळले आहेत. एनपीएफने सत्तेत सहभागी होताना मंत्रीपद नको असं सांगितलं होतं. पण आता त्यांच्या अनेक मागण्या असल्याचं दिसतंय. एनपीएफच्या मागण्या पूर्णपणे निराधार आहेत. सरकार नीट चालवण्यासाठी मित्रपक्षांना हवी ती सुविधा दिली आहे, असं भाजपचे प्रवक्ते सीएच बिजॉय यांनी म्हटलंय.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही एनपीएफच्या आरोपांवर उत्तर दिलंय. एनपीएफच्या ज्या मागण्या आहेत, त्यावर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. सरकार स्थापन करताना आमच्यात एकमत होतं, पण काही कारणास्तव त्यांच्या मागण्या अजून मान्य झालेल्या नाहीत. निकालानंतर या मागण्यांवर योग्य तो निर्णय होईल, असं बिरेन सिंग यांनी सांगितलं.

60 जागा असलेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 28, भाजपने 21, एनपीएफ 04, एनपीपी 04, एआयटीसी 01 आणि एका अपक्षाने विजय मिळवला होता. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. कारण, स्थानिक पक्षांनी काँग्रेससोबत जाण्यासाठी नकार दिला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...