AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा; सोनिया गांधींना पत्र लिहून दिला पक्षाचा राजीनामा

तीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी काही तोडगा निघाल्यास 2022 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबत जागावाटपाचा करार होण्याची मला आशा आहे, असेही अमरिंदर सिंग म्हणाले होते.

अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा; सोनिया गांधींना पत्र लिहून दिला पक्षाचा राजीनामा
अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 6:29 PM
Share

हरियाणा : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी त्यांच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव जाहीर केले आहे. सिंह यांच्या पक्षाचे नाव ”पंजाब लोक काँग्रेस” असे आहे. अमरिंदर सिंग यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या राजकीय वादानंतर अमरिंदर सिंग यांनी सप्टेंबरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत माजी मुख्यमंत्र्यांनी नव्या पक्षाची स्थापना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या आठवड्यात अमरिंदर सिंग म्हणाले होते की, त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी अर्ज केला आहे आणि निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ते जाहीर करू. (Amarinder Singh announces new political party, He wrote a letter to Sonia Gandhi and resigned from the party)

तीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी काही तोडगा निघाल्यास 2022 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबत जागावाटपाचा करार होण्याची मला आशा आहे, असेही अमरिंदर सिंग म्हणाले होते. गेल्या महिन्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. सप्टेंबरमध्ये राज्य सरकारमधून बाहेर पडलेले अमरिंदर सिंग म्हणाले होते की, ते अकालीतून फुटलेल्या समविचारी पक्षांसोबत युती करण्याचा विचार करत आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या सिंग यांनी “आपल्या लोकांचे आणि राज्याचे” भवितव्य सुरक्षित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले होते.

नवज्योत सिंग सिद्धूबाबत सोनिया गांधींच्या मौनावर प्रश्न उपस्थित

नवज्योत सिंग सिद्धू पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सात पानी राजीनामा पत्र पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंग यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, “सिद्धू (नवज्योत सिंग सिद्धू) यांची प्रसिद्धी मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मला आणि माझ्या सरकारला शिवीगाळ करणे. त्यांना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे समर्थन होते. या गृहस्थाच्या धूर्तपणावर तुम्ही डोळे मिटून गप्प आहात, ज्याला हरीश रावत मदत करत आहेत, जो सर्वात संशयास्पद व्यक्ती आहे.”

कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये निराश

आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोशल मीडियावर आपला म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले होते की, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचं जे धोरण राहिलं आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अमानित झाल्यासारखं वाटतं असंही ते म्हणाले होते. त्याच्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. (Amarinder Singh announces new political party, He wrote a letter to Sonia Gandhi and resigned from the party)

इतर बातम्या

हिमाचलमध्ये काँग्रेसची जादू, तीन विधानसभा आणि एक लोकसभेची जागा जिंकली; भाजपला जनआक्रोश भोवला?

Assembly by Election result : 13 राज्यातील 29 विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट; कोणत्या राज्यात कुणाला झटका, कुणाचा विजय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.