ममतांनी स्वत:ला देव समजू नये, CRPF मुळे मी वाचलो : अमित शाह

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये काल रात्री झालेल्या राड्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धमकीला घाबरत नाही. त्यांच्या गुंडांनी आमच्या रॅलीवर हल्ला केला. ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरचंद यांचा पुतळा तोडला. ममतांनी स्वत:ला देव समजू नये. ममतांच्या या अरेरावीला बंगाली जनताच उत्तर देईल. भाजप …

ममतांनी स्वत:ला देव समजू नये, CRPF मुळे मी वाचलो : अमित शाह

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये काल रात्री झालेल्या राड्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धमकीला घाबरत नाही. त्यांच्या गुंडांनी आमच्या रॅलीवर हल्ला केला. ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरचंद यांचा पुतळा तोडला. ममतांनी स्वत:ला देव समजू नये. ममतांच्या या अरेरावीला बंगाली जनताच उत्तर देईल. भाजप इथे 23 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल”, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला.

मागील काही निवडणुकांमध्ये ममतांच्या गुंडांनी आमच्या 7 कार्यकर्त्यांची हत्या केली. आम्ही पूर्ण भारतात निवडणूक प्रचार केला. सहा टप्प्यात कुठेही हिंसा झाली नाही, पण पश्चिम बंगालमध्येच हिंसा होत आहे. पाश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. निवडणूक आयोग इथे मूग गिळून गप्प आहे, असा आरोप अमित शाह यांनी केला.

ममता बॅनर्जींनी स्वत:ला देव समजू नये. बंगाली जनताच त्यांना उत्तर देईल. 23 मे रोजी ममतांची सद्दी संपेल, असं अमित शाह म्हणाले. शिवाय कालच्या रोड शो मध्ये झालेल्या राडेबाजीनंतर सीआरपीएफच्या जवानांमुळे वाचलो, असं अमित शाह म्हणाले.

सीआरपीएफमुळे वाचलो

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आमच्या रॅलीवर दगडफेक केली. त्यावेळी सुदैवाने मी सीआरपीएफमुळे वाचलो. या रोड शोला बंगालच्या जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दोन ते अडीच लाख लोक 7 किमीच्या रोड शोमध्ये होते. त्यावेळी आमच्यावर एक नव्हे तर 3 हल्ले झाले. तिसऱ्या हल्ल्यात दगडफेक आणि केरोसिन बॉम्ब फेकण्यात आले. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असं अमित शाह म्हणाले.

ईश्वरचंद पुतळा टीएमसीने तोडला

बंगालमध्ये आमच्या रॅलीवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला त्यावेळी पोलीस मूक दर्शक म्हणून उभे होते.  ईश्वरचंद्र यांचा पुतळा तोडला गेला. टीएमसी कार्यकर्त्यांनीच हा पुतळा तोडला. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते, टीएमसीचे कार्यकर्ते गेटमध्ये होते. त्यावेळी आतील पुतळा भाजप कार्यकर्ते कसे तोडतील, असा सवाल त्यांनी केला.  या घटनेचा व्हिडीओ मीडियाकडे आहे, त्यांनी तो सार्वजनिक करावा, असं ते म्हणाले.

तृणमूलची उलटी गिनती सुरु झाली आहे. भाजपला बंगालच्या जनतेचा पाठिंबा आहे. बंगलामध्ये कमळ फुलाणार. हिंसेच्या चिखलात कमळ फुलेल.  भाजपला देशभरात 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

जर सीआरपीएफ नसती मी तिथून सुखरूप वाचू शकलो नसतो. सुदैवामुळे मी वाचलो आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.

एफआयआरला घाबरत नाही  

माझ्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचं समजलं. पण जिथे माझ्या 7 कार्यकर्त्यांची हत्या झालीय, तिथे एफआयआर काहीच नाही. ममतादीदी आम्ही तुमच्या एफआयआरला घाबरत नाही. भाजपा कार्यकर्ते तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही, असं अमित शाह म्हणाले.

कोलकात्यात अमित शाहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार  

लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यापूर्वीच पश्चिम बंगालमधील कोलकात्यात प्रचाराने पातळी सोडून टोक गाठलं आहे. कारण प्रचारादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. कालही कोलकात्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले. कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा रोड शो निघाला होता. या रोड शोमध्येच हिंसाचार झाला. जाळपोळ आणि दगडफेकही झाली.

अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 
 • पोलिस मूक दर्शक म्हणून उभे होते – अमित शहा
 • ईश्वरचंद्र यांचा पुतळा तोडला गेला – अमित शहा
 • टीएमसीचे लोकांनी हा पुतळा तोडला – अमित शहा
 • व्हिडीओ पण मिडीयाकडे उपब्लध आहे – अमित शहा
 • टीएमसीचे कार्यकर्ते तिथे होते – अमित शहा
 • टीएमसीची उल्लटी गिन्नती सुरू झाली आहे – अमित शहा
 • चावी आली कुठून -अमित शहा
 • भाजपला बंगालच्या जनतेचा पाठिंबा – अमित शहा
 • निवडणूक आयोगांनी या प्रकरणात भूमिका घ्यायला हवी – अमित शहा
 • का निवडणूक आयोग काय करत आहेत – अमित शहा
 • निवडणूक आयोगाने निपक्षपाती पणावर प्रश्न उपस्थितीत होत आहे – अमित शहा
 • ममता बँनर्जी इंच इंच का बदला लूंगी बोलल्या – अमित शहा
 • निवडणूक आयोगाने का नाही त्यांना बँन केलं – अमित शहा
 • बंगलामध्ये कमळ फुलाणार – अमित शहा
 • हिंसेच्या चिखलात कमळ फुलेलं – अमित शहा
 • 300 पेक्षा जास्त जागा आमच्या येतील – अमित शहा
 • ममता दीदी आम्ही तुमच्या एफआयआरला घाबरत नाही – अमित शहा
 • भाजपा कार्यकर्ता तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही – अमित शहा
 • पाश्चिम बंगाल मध्ये अमित शहा विरूध्द एफआयआर
 • हिंसेमुळे केली एफआयआर दाखल
 • पाश्चिम बंगालमध्ये 23 सीटस आम्ही जिंकू – अमित शहा
 • काँग्रेस आणि ममता बँनर्जी सोबतचं आहे – अमित शहा
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *