AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिरुरमध्ये अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय, शिवाजी आढळराव पराभूत

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे विजयी झाले आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून राहुल ओव्हळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनाही अगदी अल्प मते मिळाली. या मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं होतं. यावेळी शिरुरमध्ये 59.46 टक्के मतदानाची […]

शिरुरमध्ये अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय, शिवाजी आढळराव पराभूत
| Updated on: May 23, 2019 | 4:48 PM
Share

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे विजयी झाले आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून राहुल ओव्हळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनाही अगदी अल्प मते मिळाली.

या मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं होतं. यावेळी शिरुरमध्ये 59.46 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली.

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक

महाराष्ट्रातील राजकीयदृष्या रंगतदार लढत म्हणून शिरुर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जाते. एकीकडे सलग 3 वेळा शिरुर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील होते. तर दुसरीकडे शिवसेनेतून नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले स्वराज्य रक्षक संभाजी या टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले डॉ. अमोल कोल्हे होते. या दोघांमध्ये जनतेने अमोल कोल्हे यांना कौल दिला आहे.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून घरघरात पोहोचलेले डॉ. अमोल कोल्हे यांना त्यांच्या मालिकेतील कसदार भूमिकेचा मोठा फायदा झालेला पाहायला मिळाला.

गेल्या 15 वर्षांपासून दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदारांची नाराजी पहायला मिळाली. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांना मतदारसंघाची इतंभूत माहिती तर होतीच. सोबत राजकारणाचा दीर्घ अनुभव आणि गेल्या 20 वर्षांपासून राजकारणातील सक्रियता याही त्यांच्या जमेच्या बाजून होत्या. मात्र, अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वरुपातील प्रतिमाच जनतेला अधिक आश्वासक वाटल्याचे निकालाने सिद्ध केले.

कोणाकोणाच्या सभा?

शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने यावेळी शिवसेना भाजप महायुतीकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राज्यमंत्री विजय शिवतारे,शिवसेना चित्रपट सेना उपाध्यक्ष सुबोध भावे तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीकडून माजी कृषीमंत्री शरद पवार,माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,छगन भुजबळ,राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील आदींच्या सभा शिरुर लोकसभा मतदारसंघात झाल्या.

प्रचाराचे मुद्दे

शिरुर लोकसभा क्षेत्रामधील पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर या महामार्गावरील वाहतूक कोंडी, विमानतळ प्राधिकरण यांच्या आहावालाने खेड तालुक्यातील बहुचर्चित असे खेडचे विमानतळ गेल्याने, हा सुद्धा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला बैलगडा शर्यत बंदी या आणि अशा अनेक मुद्द्यांनी यंदा प्रजार गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्याची आस्था असलेला बैलगाडा बंदी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. तो मुद्दा मीच सोडवणार असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत शिरुर लोकसभा मतदारसंघात 1 टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली.

2014 विधानसभानिहाय मतदान आकडेवारी

जुन्नर-1,80,990 आंबेगाव-1,86,130 खेड-आळंदी 1,75,022 शिरुर-1,79,566 भोसरी-1,77,113 हडपसर-1,89,829

2019 विधानसभानिहाय मतदान आकडेवारी

जुन्नर-1,93,965 आंबेगाव-1,97,052 खेड-आळंदी-2,02,740 शिरुर-2,27,542 भोसरी-2,37,767 हडपसर-2,33,316

विधानसभा मतदारसंघ 2019 मधील मतदान%

शिरुर -52% आंबेगाव-47% जुन्नर-90% खेड-आळंदी -76% भोसरी-70% हडपसर-84% एकूण मतदार संख्या -21,73,448

2019 मधील शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 21 लाख 20 हजार 988 मतदारांपैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत येथे मतदानात 1 ते दीड टक्यांनी घट झाली. भोसरी विधानसभा आणि हसपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.