AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…नाहीतर फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता, चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये," असा टोला अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना लगावला. (amol mitkari chitra wagh maha vikas aghadi)

...नाहीतर फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता, चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर
अमोल मिटकरी आणि चित्रा वाघ
| Updated on: Feb 27, 2021 | 3:41 PM
Share

मुंबई : “किशोर वाघ(Kishor Wagh) सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये,” असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना लगावला. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत वरील भाष्य केले. त्यांनी चित्रा वाघ यांचा मुद्दा खोडून काढला.  (Amol Mitkari criticizes Chitra Wagh on alleging to Maha Vikas Aghadi government)

किशोर वाघ यांची चौकशी भाजपनेच लावली

अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. किशोर वाघ यांच्यावर यापूर्वी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याहीपेक्षा सन 2016 रोजी भाजपनेच याबाबत खुली चौकशी लावलेली आहे, असा खुलासा अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे केला. तसेच चित्रा वाघ यांनी भाजपत प्रवेश केला नसता तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असता, असा दावाही त्यांनी केला. ही बाजू मांडताना त्यांनी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याची एफआरआयची कॉपीसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे.

शरद पवारांच्या तालमीत तयार, मग दिशाभूल करु नका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर चित्रा वाघ रोज पत्रकार परिषद घेऊन सरकारला दारेवर धरत आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं वाघ यांनी यापूर्वी अनेकवेळा बोलून दाखवलं आहे. या पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्याचे बोलून दाखवले होते. याच मुद्द्यावरुन आज अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. “तुम्ही भाजपमध्ये गेल्या नसता तर देवेंद्र फडणवीस यांनीच किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता, तुम्ही शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्या आहात. तुम्ही लोकांची दिशाभूल करु नका,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांच्यावर मिटकरी यांनी टीकेचा बाण सोडला.

चित्रा वाघ काय म्हणाल्या? 

“लाच घेतल्याचे प्रकरण घडले तेव्हा माझे पती किशोर वाघ घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरातही नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरु आहे. 2011 पासून एसीबीच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच,  माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

एसीबीने ज्याप्रकारने तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना तीनदा सॅल्यूट ठोकते. मी पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर रोज दबाव आणला जातोय, त्यांना टॉर्चर केले जात आहे. पण मला न्यायव्यस्थेवर विश्वास आहे, ती सरकारसारखी मुर्दाड नाही. मी या सरकारला एकटी पुरून उरेन. मी तुमच्यासोबत 20 वर्षे काम केले आहे, हे विसरु नका, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

इतर बातम्या :

‘चित्रा वाघ वाघीण का बनल्या?’, पूजा चव्हाण प्रकरणाची माजी IPS अधिकाऱ्याकडून चिरफाड!

(Amol Mitkari criticizes Chitra Wagh on alleging to Maha Vikas Aghadi government)
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.