AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात या, सरकारच्या कामांचा ग्रंथ वाचायला देतो; अमोल मिटकरींचा फडणवीसांवर पलटवार

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे. त्यांना सरकारच्या कामाचा ग्रंथ वाचायला देतो, असा पलटवार अमोल मिटकरी केला.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात या, सरकारच्या कामांचा ग्रंथ वाचायला देतो; अमोल मिटकरींचा फडणवीसांवर पलटवार
| Updated on: Nov 28, 2020 | 9:31 PM
Share

मुंबई : “राज्य सरकारच्या वर्षभरातील कामांचा एक ग्रंथ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे. त्यांना तो ग्रंथ वाचायला देतो.” असा घणाघाती पलटवार राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Amol Mitkari criticizes Devendra Fadnavis on criticizing Maharashtra government)

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त (28 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. यावेळी बोलताना, “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र सरकारची अचिव्हमेंट काय आहे?” असा सवाल फटणवीस यांनी केला होता. त्या प्रश्नाला अमोल मिटकरी यांनी वरील उत्तर दिले.

“महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. सरकारमधील सर्व मंत्र्यांनी चांगले काम केले. सरकारने वर्षभरात महात्मा फुले कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत, कोरोना काळात शिवभोजन थाळी अशा अनेक योजना राबवल्या. राज्य सरकारच्या वर्षभरातील कामांचा एक ग्रंथ आहे. देवेंद्र फडणवीस यांना वेळ भेटला तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे. त्यांना तो ग्रंथ वाचायला देतो,” असे अमोल मिटकरी म्हणाले.

फडणवीसांना नैतिक अधिकार नाही

देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर प्रश्न निर्माण केल्यानंतर मिटकरी यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. “सरकारने काय केले?, हे विचारण्याचा देवेंद्र फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. कारण, फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही,” असा दावा मिटकरी यांनी केला. तसेच, यावेळी महाविकास आघाडी सरकार हे पूर्ण 5 वर्षे टिकेल असा दावाही त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कोरोना काळातील भ्रष्टाचार उघडा पाडणार- फडणवीस

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. इतकंच नाही तर कोरोना संकटाच्या काळात करण्यात आलेल्या उपायोजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. हा भ्रष्टाचार उघडा पाडण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

धमकावणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही- फडणवीस

“महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली. (Amol Mitkari criticizes Devendra Fadnavis on criticizing Maharashtra government)

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश