पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

महिला दिनानिमित्त घेतलेल्या अमृता फडणवीस यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर (Amruta Fadnavis Interview) दिली.

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : “गेल्या महिन्यात काही माणसांची खरी ओळख (Amruta Fadnavis Interview) पटली. कोण आपलं हे कळलं. लोकं कसे वागू शकतात. राजकारणात कुणीही कुणाला धोका देऊ शकतं हे कळलं,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली. महिला दिनानिमित्त घेतलेल्या ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यावेळी अमृता फडणवीसांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.

देवेंद्र फडणवीसांनी पहाटे मुख्यमंत्रिपदाची (Amruta Fadnavis Interview) शपथ घेतली होती, त्या शपथविधीबाबत काय वाटतं? असा प्रश्न अमृता फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला त्या पहाटे 3 ते 4 वाजता कळलं की उद्या शपथविधी होणार आहे. मी त्या शपथविधीला उपस्थित होते. आजही मला ते प्रसंग आठवतात. तेव्हा त्यावरुन हसायला येतं. पण मी त्या अनुभवातून खूप काही शिकले.”

एकाच दिवशी वाढदिवस, एकाच दिवशी शपथ, एकाच दिवशी राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवारांनी फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी 2019 दुपारी 4 वाजता त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री ठरले होते.

ठाकरे सरकारचं काम सुरुचं नाही

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे काम अजून सुरु झालेले नाही. त्यांचं काम सगळं पेपरवर आहे. त्यांचं काम दिसेल तेव्हा मी बोलेन,” असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

“देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या माणसाला ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी कायम आवाज उठवला. अशा माणसाला महिलांची माफी मागायला सांगितली हे पटलं नाही,” असेही अमृता फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

विशेष म्हणजे अमृता फडणवीसांनी यावेळी टीका करणाऱ्यांना धन्यवाद दिले. “मी टीकाकारांना धन्यवाद देते. त्यांनी मला आणखी सशक्त बनवलं.”

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रश्मी ठाकरे या खूप लोकांच्या आदर्श आहेत. त्यांचं आणि माझं बाँडिग चांगलं आहे. असे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis Interview) म्हणाल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI