Andheri East by-poll | शिवसेना उद्धव गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांना कोण करतंय आपल्या पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न?

ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र लटके यांनाच आपल्याकडे खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Andheri East by-poll | शिवसेना उद्धव गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांना कोण करतंय आपल्या पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 9:53 AM

गिरीश गायकवाड, मुंबईः पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता अंधेरी पोट निवडणुकीतील उमेदवारही गमावणार का अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. असं घडलं तर उद्धव ठाकरेंसाठी मोठं संकट उभं राहणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची (Andheri East By poll) पोटनिवडणूक ही आगामी मुंबई पालिकेची ट्रेलरच आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा आणि उद्धव ठाकरे गट या तिघांसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. शिवसेनेने  (Shivsena)जाहीर केलेल्या उमेदवारालाच खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र लटके यांनाच आपल्याकडे खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात ऋतुजा लटके यांना आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आपला पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची उच्चपदस्थ सूत्रांची माहीती आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांचं मे 2022 मध्ये निधन झालं होतं. त्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. येत्या नोव्हेंबर महिन्यात इथे पोटनिवडणूक होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची लढत ठरणार आहे.

पाहा व्हिडिओ-

शिवसेनेने महाविकास आघाडीअंतर्गत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

त्याामुळेच शिवसेनेला मिळत असलेल्या सहानुभूतीला काटशाह देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. भाजप नेते मुरजी पटेल यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी काम सुरू केले आहे. तरीही अद्यापअधिकृत घोषणा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आत्ता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.