अजितदादा, अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता, अनिल परबांचा का नाही?, नितेश राणेंचा सवाल

समीर भिसे

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 9:44 AM

भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही चौकशीपूर्वी राजीनामा दिला होता. तर मग अनिल परब राजीनामा का देत नाहीत? असा सवाल अनिल परब यांनी केलाय.

अजितदादा, अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता, अनिल परबांचा का नाही?, नितेश राणेंचा सवाल
नितेश राणे, अनिल परब

मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून मंगळवारी तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. त्यावेळी आपण ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यापुढेही आपण ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं अनिल परब म्हणाले. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही चौकशीपूर्वी राजीनामा दिला होता. तर मग अनिल परब राजीनामा का देत नाहीत? असा सवाल अनिल परब यांनी केलाय. (MLA Nitesh Rane demands resignation of Transport Minister Anil Parab)

अनिल परब पदाचा राजीनामा का देत नाहीत? ते मंत्रीपदावर असताना त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव येत नाही का? जर त्यांचं मन स्वच्छ असेल, त्यांनी चूक केली नाही, तर त्यांनी स्वत:ला सिद्ध करावं. ‘मातोश्री’चे हे ‘परिवार मंत्री’ आहेत, म्हणून यांना वेगळा न्याय आहे का? असा खोचक सवालही नितेश राणे यांनी केलाय. संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. बाकी सगळे राजीनामा देणार आणि हे पदावर असताना चौकशीला सामोरे जाणार हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय नाही का? असंही नितेश राणेंनी विचारलंय.

नितेश राणेंचा संजय राऊतांनाही टोला

नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. गोवा विधानसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊतांच्या या टीकेला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत जिथे जिथे जातात तिथे आमची सत्ता येते. बेळगावमध्ये काय झाले? आज मी देवाचे आभार मानले की त्यांच्यावर अशीच जबाबदारी दे. कारण हा माणूस सगळीकडे जाऊन फक्त शिवसेना संपवण्याचं काम करत आहे, अशी घणाघाती टीकाही नितेश राणेंनी केलीय. गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारावं. कारण त्यांना माहिती आहे की गोव्याचा किती छान विकास झालाय, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.

‘मुंबई महापालिकेचं डिपॉझिट तोडून शेतकऱ्यांना मदत द्या’

मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या हातात होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं आहे. शेतकऱ्यासमोर कसं जगायचं असा प्रश्न आहे. मुंबई महापालिकेकडे 80 हजार कोटीच्या ठेवी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन आहे की राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून केंद्राकडे काही मागण्यापेक्षा हे 80 हजार कोटीचं डिपॉझिट तोडा आणि शेतकऱ्यांना मदत करा. आता तुमची सत्ता आहे. राज्यातील शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री हा निर्णय घेणार का? मुंबई महापालिकेचं 80 हजार कोटीचं डिपॉझिट तोडणार का? असा सवाल नितेश राणेंनी केलाय. त्यांना कुणाला विचारण्याची गरज नाही. मात्र, त्यांचा हेतू स्वच्छ असला पाहिजे, असा टोलाही नितेश राणे यांनी यावेळी लगावलाय.

इतर बातम्या :

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा, पालघरमध्ये नाना पटोलेंचं मतदारांना आवाहन

अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

MLA Nitesh Rane demands resignation of Transport Minister Anil Parab

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI