हर्षवर्धन पाटलांची लेक 4 मागण्या घेऊन राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला

भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील (Ankita patil) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यपालांजवळ 4 मागण्या केल्या. पुण्यातल्या राजभवनात रविवारी ही भेट झाली.

हर्षवर्धन पाटलांची लेक 4 मागण्या घेऊन राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली...


पुणे : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील (Ankita Patil) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यपालांजवळ 4 मागण्या केल्या. पुण्यातल्या राजभवनात रविवारी ही भेट झाली.

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या 4 मागण्यांचे निवेदन देऊन राज्यपाल महोदयांशी विविध विषयांवरती चर्चा केली.

अंकिता पाटील यांच्या राज्यपालांकडे 4 मागण्या

या भेटीप्रसंगी एम. पी. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून योग्य पद्धतीने प्रवेश देणे, इंजिनियरिंग व मेडिकल प्रवेश संदर्भातील पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रसह पुणे ग्रामीण व विशेष करून इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सक्तीने केली जाणारी वीज तोडणी थांबवण्याबाबत महामहिम राज्यपाल महोदय यांना अंकिता पाटील यांनी विनंती केली.

राज्यपालांचा पुणे दौरा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते राजभवनात परिसरात
ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्यपालांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे.

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली. यावेळी राज्यपाल महोदयांनी पुरंदरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसंच अखंड आयुष्य शिवरायांप्रती वाहून घेतल्याने त्यांना धन्यवाद दिले.

राज्यपाल सिंहगड किल्ल्याचा दौरा करणार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सिंहगड किल्ल्याचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.  राज्यपाल कोश्यारी यांचा 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार आहे.

(Ankita Harshvardhan Patil Met Governor Bhagat Singh Koshyari)

हे ही वाचा :

भागवत कराड पंकजाच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रितमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, यात्रेआधीच राडा

मंडल आयोगावर लोकसभेत खडाजंगी चर्चा सुरू होती, वाजपेयी पासवानांना म्हणाले, तुम्ही फारच ब्राह्मणविरोधी दिसता

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI