AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022, Ward (2): प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजप, काँग्रेसमध्ये चुरस!

ARMC Election 2022 गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन अ मधून चंद्रकांत बोमरे हे विजयी झाले होते, प्रभाग क्रमांक दोन ब मधून सुरेखा लुंगारे, क मधून प्रमिला गजानन जाधव तर प्रभाग क्रमांक दोन ड मधून बाळू भुयार हे विजयी झाले होते.

ARMC Election 2022, Ward (2): प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजप, काँग्रेसमध्ये चुरस!
| Updated on: Jul 25, 2022 | 9:12 PM
Share

अमरावती : अमरावती (Amravati) महापालिकेचा निवडणूक (election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 2017 च्या निवडणूक आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्यावेळी अमरावती महापालिकेत एकूण 87 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यापैकी सर्वाधिक जागा भाजपाने (BJP) जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत 45 जागा जिंकत भाजपाने महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली होती. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आणि शिवसेना चौथ्या क्रमांकावर होती. सध्या राज्यातील राजकीय समिकरणे वेगाने बदलत आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक असेल. तर दुसरीकडे पुन्हा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने भाजप निवडणूक रिंगणात उतरेल. प्रभाग क्रमांक दोनबाबत बोलयाचे झाल्यास गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन अ मधून चंद्रकांत बोमरे हे विजयी झाले होते, प्रभाग क्रमांक दोन ब मधून सुरेखा लुंगारे, क मधून प्रमिला गजानन जाधव तर प्रभाग क्रमांक दोन ड मधून बाळू भुयार हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक 2 मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रतिक नगर, देशमुख कॉलनी, योगीराज कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, राजमाता कॉलनी, आरोग्य कॉलनी, पीकेव्ही संशोधन केंद्र, खंडेलवाल लेआऊट, गायत्री नगर, सुरक्षा कॉलनी, पोस्टल कॉलनी, तपोवन, डेंटल कॉलेज, उत्कष कॉलनी, चिलमछावनी, गणेडीवाल ले-आऊट, वृदांवन कॉलनी या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 2 मध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक 2 ची एकूण लोकसंख्या 17923 इतकी असून, त्यापैकी 3138 इतकी अनुसूचित जातीची तर 917 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार अमरावती महापालिका प्रभाग क्रमांक दोन अ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक दोन ब हा सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक क हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 अ

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 ब

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 क

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास अमरावतीमध्ये भाजपाचे पारडे जड वाटते. गेल्या काही दिवसांत राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या सर्व भाजपाच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत.आता राज्यात देखील भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप पूर्ण शक्तीने उतरणार आहे. तर दुसरीकडे मात्र सध्या शिवसेनेत फूट पडली असून, अद्यापही गळती सुरूच आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकने शिवसेनेसाठी मोठे आव्हान असणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.