AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना म्हणजे ‘प्राण जाये पर वचन न जाये’; जावडेकरांच्या ‘त्या’ आरोपांवर सावंतांचे प्रत्युत्तर

'प्राण जाये पर वचन न जाये' हे वचन शिवसेना पाळते, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी दिले.

शिवसेना म्हणजे 'प्राण जाये पर वचन न जाये'; जावडेकरांच्या 'त्या' आरोपांवर सावंतांचे प्रत्युत्तर
| Updated on: Dec 08, 2020 | 8:54 PM
Share

मुंबई : “गद्दारी आणि शिवसेना हा शब्दच लागू पडू शकत नाही. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे वचन शिवसेना पाळते, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना दिले. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना “महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेला मंगळवारी (8 डिसेंबर) दिला. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून सावंत यांनी वरिल वक्तव्य केले. ते मुंबईत ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

“मला आश्चर्य वाटतं प्रकाश जावडेकर यांचा तोल गेलाय. सहसा ते असे वक्तव्य करत नाहीत. पण दुर्दैवाने ते असे बोलले असतील. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कमी करुन त्या 56 जागांवर कशा आणाव्यात याचा विचार कोण करत होतं? गोव्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गात ठाण मांडून का बसले होते?,” असे सावंत म्हणाले. तसेच, शिवसेनेच्या जागा कमी करण्याचा प्रयत्न करणे ही गद्दारी होती की इमानदारी होती, असा सवालही त्यांनी जावडेकर यांना विचारला.

अमित शाहा उत्तर न देता हरियाणाला गेले

“राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपने शिवसेनेला शब्द दिला आहे, की नाही याचे उत्तर अमित शाहा यांनी दिले नाही. ते उत्तर न देता ते हरियाणाला गेले. सत्याला सामोरं जाण्यासाठी धारिष्ट्य लागतं. अमित शाहा गेले ते आलेच नाहीत. याच कारणामुळे महाराष्ट्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला साथ दिली.” तसेच, विधानपरिषदेच्या निकालामुळे महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा असल्याचंही ते म्हणाले.

प्रकाश जावडे कर काय म्हणाले ?

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश जावडेकर (BJP Prakash Javdekar) यांनी दिला. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले. कृषी कायद्यांबाबत 95 टक्के शेतकऱ्यांना कसलीही समस्या नाही. पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. तो आम्ही लवकर दूर करू. पंजाबमध्ये सरकारकडून सर्वात जास्त धान्य खरेदी झाली. मात्र, तेथील शेतकऱ्यांचा हमीभावाविषयी गैरसमज झाला आहे. अनेकदा गैरसमज दूर करायला वेळ लागतो. पण उद्याच्या बैठकीत सगळे गैरसमज दूर होतील, असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. (Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

संबंधित बातम्या :

शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली; शरद पवारांपुढे लीन झालेय: प्रविण दरेकर

‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’

व्यावसायिक वाहतूक संघटनांचे पदाधिकारी कृष्णकुंजवर, राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिलासा

(Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...