मुख्यमंत्र्यांचा ताफा मार्गस्थ होताच शिवसैनिकांकडून रस्त्याचे शुद्धीकरण, कुठे घडला प्रकार?
पैठण शिवसेना तालुका प्रमुखांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे. आतापर्यंत शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून हिणवले जात होते, पण आता कृतीमधून शिवसैनिक दाखवून देत आहेत. शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे यांच्या नेतृ्त्वात निलजगाव फाटाजवळ शिवसैनिकांनी हे कृत्य केले आहे.

औरंगाबाद : (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (Paithan) पैठण शहरामध्ये जाहिर सभा होत आहे. आतापर्यंत सभेला गर्दी आणि गर्दीसाठी पैसे वाटप यावरुन ही सभा चर्चेत होती. आता (Shivsainik) शिवसैनिकांच्या वेगळ्याच भूमिकेमुळे पुन्हा सभा चर्चेत आली आहे. ज्या मार्गावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मार्गस्थ झाला. त्याच रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून तो शुद्ध केला आहे. एवढेच नाहीतर यावेळी शिवसैनिकांनी 50 खोके..एकदम ओके च्या घोषणाही दिल्या.
निलजगाव फाटा येथील घटना
पैठण शिवसेना तालुका प्रमुखांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे. आतापर्यंत शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून हिणवले जात होते, पण आता कृतीमधून शिवसैनिक दाखवून देत आहेत. शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे यांच्या नेतृ्त्वात निलजगाव फाटाजवळ शिवसैनिकांनी हे कृत्य केले आहे. त्यामुळे पैठण येथे होत असलेल्या सभेवर शिवसैनिकांमध्ये किती रोष आहे हेच समोर आलयं.
यापूर्वीही घडली होती घटना
शिंदे गटातील मंत्री मार्गस्थ झाला की रस्ता शुद्धीकरणाची जणू काही प्रथाच सुरु झाली आहे. यापूर्वी आरोग्य मंत्री तानाजी सावंत माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे दाखल झाले होते. तेव्हा देखील शिवसैनिकांनी रस्त्याचे शुद्धीकरणच केले होते. आता तोच प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.
