आशिष शेलार ‘एमसीए’ निवडणुकीच्या रिंगणात?; ‘या’ माजी क्रिकेटपटूचे असणार आव्हान

येत्या  20 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार पुन्हा एकदा एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आशिष शेलार 'एमसीए' निवडणुकीच्या रिंगणात?; 'या' माजी क्रिकेटपटूचे असणार आव्हान
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 10:46 AM

दिनशे दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई : येत्या  20 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) पुन्हा एकदा एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. आशिष शेलार  हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांचा सामना माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शेलार विरूद्ध पाटील अशी लढत झाल्यास तब्बल 11 वर्षानंतर क्रिकेटर विरुद्ध राजकारणी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.

…तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता

भाजप नेते आशिष शेलार हे यापूर्वी देखील एमसीएचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मात्र त्यांनी 2019 साली अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे यंदा शेलार हे पुन्हा एकदा एमसीएची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्या गटाकडून माजी क्रिकेटर संदीप पाटील हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र संदीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या दावेदारीत ऐनवेळी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्यास  ही लढत बिनविरोध होऊन आशिष शेलार पुन्हा एका एमसीएचे अध्यक्ष होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

2011 साली रंगला क्रिकेटर विरुद्ध राजकारणी सामना

11 वर्षांपूर्वी  माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर विरुद्ध माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अशी लढत झाली होती. त्यानंतर आता तब्बल 11 वर्षांनी जर आशिष शेलार यांनी ही निवडणूक लढवल्यास आणि शरद पवार गटाकडून संदीप पाटील यांना संधी मिळाल्यास पुन्हा एकदा क्रिकेटर विरुद्ध राजकारणी असा सामना पहायला मिळू शकतो.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.