AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबमध्ये काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक फुसका? सिद्धू पराभवाच्या छायेत, चन्नी, आपमध्येही जमीन अस्मानचा अंतर

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये यावेळी जनतेने 'आप'ला पसंती दिली आहे. तर काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल 89 उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ 16 जागांवर आघाडी घेतली आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक फुसका? सिद्धू पराभवाच्या छायेत, चन्नी, आपमध्येही जमीन अस्मानचा अंतर
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 1:07 PM
Share

चंदिगढ : आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये (Punjab) यावेळी जनतेने ‘आप’ला (APP) पसंती दिली आहे. तर काँग्रेसची (Congress) सपशेल पिछेहाट झाली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल 89 उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ 16 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस पाठोपाठ शिरोमणी अकाली दल सात तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. एकूण आजचा निकाल पाहाता. पंजाबमध्ये काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक फसल्याचे पहायला मिळत आहे. पंजाबमध्ये दलितांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काँग्रेसनं चरणजित सिंग चन्नी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपद दिले. त्यावेळी तो काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक असल्याचं सांगितलं गेलं तशी चर्चा झाली. पण प्रत्यक्षात असं काही घडलेलं दिसत नाहीये. मुख्यमंत्री दलित असल्यास व्होट बँक वाढेल असा काँग्रेसला अंदाज होता. मात्र पंजाबमधील जनतेने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

सिद्धू, अमरिंदरिंगांना फटका

दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू हे मुळचे भाजपचे होते. मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिद्धू यांच्या प्रवेशामुळे पंजाब काँग्रेस अस्थिर झाले. काँग्रेसमधील कलह वाढला. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एवढं सगळं होऊन देखील सिद्धू यांच्या हाती काहीच लागले नाही. सध्या समोर येत असलेल्या निकालानुसार सिद्धू त्यांच्या मतदारसंघातून पिछाडीवर आहे. तर कॅप्टन अमरिंदरसिंग हे पंजाबचे दिर्घकाळ मुख्यमंत्री राहिले. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपाचा हात धरला. मात्र जनतेला त्यांचा हा निर्णय फारसा रुचलेला दिसत नाहीये. अमरिंदरसिंग सध्या त्यांच्या मतदारसंघातून तब्बल दहा हजार मतांनी मागे आहेत.

आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

आपने पंजाबमध्ये बाजी मारली आहे. तब्बल 89 जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार अवघ्या 16 जागांवर आघाडीवर आहेत. पंजाबमधील विधानसभेची या निवडणूकीत आप आणि काँग्रेसमध्ये चुरस पहायला मिळेल अशी अपेक्षा होती मात्र आपने काँग्रेसला धोबीपछाड दिलाय. पंजाबमध्ये आपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून, आपल्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

Goa Election Result 2022 | गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार? प्रमोद सावंत पुन्हा? विश्वजीत राणेंनी सस्पेन्स निर्माण केला

‘प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला’ मनसे नेते म्हणतात, ‘पर्याय उपलब्ध असतात’

Punjab Election Live: पंजाबात आपची विजयी घोडदौड, दिल्लीच्या कार्यालयात फुलांचा घमघमाट

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.