Santosh Bangar : ‘बांगर यांनी माझ्या कानशिलात मारून दाखवावं!’ अयोध्या पौळ यांचे बांगरांना ओपन चॅलेंज

संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यापासून त्यांच्यावर टिकेची झोड उडत आहे. विशेषत: सोशल मिडियावर 'गद्दार' अशा कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र, आपण गद्दार नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले होते. शिवाय खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असेही ठणाकावून सांगितले होते. शिंदे गटात सहभागी झालेल्या बांगरांना एकनाथ शिंदे यांनीच जिल्हाप्रमुख पद बहाल केले आहे.

Santosh Bangar : 'बांगर यांनी माझ्या कानशिलात मारून दाखवावं!' अयोध्या पौळ यांचे बांगरांना ओपन चॅलेंज
अयोध्या पौळ, सेना सोशल मिडियाच्या समन्वयक
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 1:02 PM

हिंगोली : हिंगोलीचे आमदार (Santosh Bangar) संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवाय ते अधिक आक्रमकही झाले असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरुन समोर येत आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांनी गद्दारच नव्हे तर शिव्या-शापही दिले होते. शिवसेनेशी कट्टर असलेले बांगर मात्र, बहुमताच्या दिवशी (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी झाले होते. आता शिंदे गटात सहभागी झालेल्या प्रत्येक आमदाराला गद्दार म्हणण्याचा जणूकाही ट्रेंडच सुरु झाला आहे. बांगर यांना मात्र ‘गद्दार’ हा शब्द झोंबला असून जो कोणी गद्दार म्हणेल त्याच्या कानशिलात मारा असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, त्यांचे आवाहन सेना सोशल मिडियाच्या समन्वयक (Ayodhya Paul) अयोध्या पौळ यांनीच स्विकारले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होत आहे. एक वेळा नाही तर लाखवेळेस आपण त्यांना गद्दारच म्हणणार असेही पौळ म्हणाल्या आहेत.

काय म्हणाले होते आ. संतोष बांगर ?

संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यापासून त्यांच्यावर टिकेची झोड उडत आहे. विशेषत: सोशल मिडियावर ‘गद्दार’ अशा कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र, आपण गद्दार नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले होते. शिवाय खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असेही ठणाकावून सांगितले होते. शिंदे गटात सहभागी झालेल्या बांगरांना एकनाथ शिंदे यांनीच जिल्हाप्रमुख पद बहाल केले आहे. त्यानंतर मतदार संघात येताच आता कोणी गद्दार असा उल्लेख केला तर त्यांच्या कानशिलात लावा असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत अयोध्या पौळ?

आ. संतोष बांगर यांच्या आव्हानाला ओपन चॅलेंज दिल्याने अयोध्या पौळ ह्या देखील चर्चेत आल्या आहेत. अयोध्या पौळ ह्या सेना सोशल मिडियाच्या समन्वयक आहेत.सेशल मिडियाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्यक्रम, संवाद हे देखील प्रसारित केले जातात. मात्र, त्या सोशल मिडियाचे काम करीत असल्याने केवळ संतोष बांगर यांच्याकडूनच नाहीतर इतरांकडूनही आपल्याला अशा धमक्या आल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपासला नाहीतर काय असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

‘माझ्या कानशिलात मारुन दाखवा’

आ. संतोष बांगर यांनी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानशिलात मारा असे म्हणताच त्यांचे आव्हान अयोध्या पौळ यांनी स्विकारले आहे. एक वेळा नाही लाख वेळा आपण असेच म्हणणार. जीव गेला तरी चालेल पण आपल्या भूमिकेपासून माघार घेणार नसल्याचे पौळ यांनी सांगितले आहे. शिवाय घडलेला प्रकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कानावर देखील घातल्याचे त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता भविष्यात काय होणार हे पहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.