कोल्हापूर आमच्याच वाट्याला, आम्ही निर्णय घेऊ : बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर पालकमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Kolhapur Gaurdian Ministership).

कोल्हापूर आमच्याच वाट्याला, आम्ही निर्णय घेऊ : बाळासाहेब थोरात

मुंबई : महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर पालकमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Kolhapur Gaurdian Ministership). कोल्हापूर काँग्रेसच्याच वाट्याला आलं आहे. कोल्हापूरचा पालकमंत्री कोण होणार यावर आम्हीच निर्णय घेऊ, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं (Kolhapur Gaurdian Ministership). ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “आम्हाला 12 पालकमंत्रिपदं मिळाले. यात कोल्हापूर काँग्रेसच्या वाट्याला आलं आहे. त्यामुळे कोल्हापूरचा पालकमंत्री कोण असेल याचा आम्ही निर्णय घेऊ. सध्या मी कोल्हापूरचा पालकमंत्री आहे. मात्र, असं असलं तरी माझ्या ऐवजी आमचा कोणताही एक मंत्री कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेईल आणि काम करेल. यात काही रागवणं नाही, रुसणं नाही.”

“वाडिया हॉस्पिटलला मदत केली पाहिजे, कॅबिनेटमध्ये हा विषय आणणार”

बाळासाहेब थोरात यांनी वाडिया हॉस्पिटलबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “वाडिया हॉस्पिटलची मोठी रक्कम थकबाकी आहे. त्या रुग्णालयाला मदत केली पाहिजे. त्यासाठी मी हा विषय कॅबिनेट बैठकीत मांडेल.”

नारायण राणे भाजपमध्ये जाऊन अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता काय आहे हे मला माहिती आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राणेंना टोला लगावला.

भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईवरुन हात फिरवण्याचं महत्त्व आहे. मात्र, त्याला विशेष वेगळं म्हणून पाहायची गरज नाही, असं म्हणत त्यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं.

“देश अडचणीत नेणाऱ्याची तुलना शिवरायांशी होऊच कशी शकते?”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्यासोबतच सुराज्यही होतं. इथं मात्र उलटं करण्यात आलं. देश चांगला सुरु होता, त्याला कठीण परिस्थितीत नेण्याचं काम करण्यात आलं. ते करणाऱ्यांची तुलना शिवाजी महाराजांशी होऊच कशी शकते? म्हणून या पुस्तकाचा आम्ही निषेध करतो. भाजपनं ते पुस्तक तर मागं घ्यावंच, पण संपूर्ण देशातील जनतेची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.”

Published On - 5:53 pm, Mon, 13 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI