Uddhav Thackeray : बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही तर वाजपेयींचा भाजप तरी कुठे राहिला?; उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार

Uddhav Thackeray : बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही तर वाजपेयींचा भाजप तरी कुठे राहिला?; उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप नेते हे महागाईवर बोलायला तयार नाही. मागे पंतप्रधानांनी कोविडवर सभा घेतली. त्यात त्यांनी इलाज सांगितला. त्यावेळी देशातील राज्यांचे सर्व मुख्यमंत्री होते.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 14, 2022 | 9:43 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची आज मुंबईच्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकेच काय तर यावेळी मनसे, एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी, तसेच राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. आपण औरंगाबादला संभाजीनगरच म्हणत आलो असल्याचं ते म्हणाले. अकबरुद्दीन औवेसी यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील दौऱ्यादरम्यान औरंगजेबच्या कबरीवर फुलं अर्पण केले होते. त्यांच्या या वागणुकीवर राज्यभरातून टीका केली जात होती. औवेसींच्या या कृत्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी देखील घेत शाब्दिक निशाणा साधला. तर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून मुख्यमंत्री ठाकरे यांना निशाना करणाऱ्या भाजपला (BJP Party) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली. त्यांनी यावेळी माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी (Former Prime Minister Atal Bihari Vajpayee) यांची आठवन करून दिली आहे. त्यांची आठवण सांगतानाल 1973 साली काँग्रेस सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते हे विसरला का? तर पेट्रोलची सात पैशांनी दरवाढ झाली होती म्हणून वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप पक्ष गेला कुठे? असं म्हटले आहे.

भाजप आणि फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मुंबईच्या बीकेसी मैदानावर जाहीर सभेत भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसेच राज्यातीत महागाईवर ओरडणाऱ्या भाजपला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी जरा माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांना आठवा. त्यावेळची भाजप आठवा असं म्हटलं आहे. 1973 साली काँग्रेस सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते हे विसरला का? तर पेट्रोलची सात पैशांनी दरवाढ झाली होती म्हणून वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप पक्ष गेला कुठे? असा सवाल ही भाजपला आणि फडणवीस यांना केला. तसेच तुम्ही सांगता ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. मग इथे कोण आहे? ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजप तरी अटलजींचा राहिला आहे का?” तर म्हाळगी प्रबोधिनीत यांचे चिंतन तेव्हा जावस वाटायचं. मग आता प्रश्न पडतो तिथे तुम्ही हे शिकवता का? ते शिकेलेले कुठे गेले? आता कोण आहे तिथे? आपण खोट बोलण्यात कमी पडतो तो भाजपच्या हिंदुत्वात बसतो का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

भाजप नेते हे महागाईवर बोलायला तयार नाही

तसेच मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप नेते हे महागाईवर बोलायला तयार नाही. मागे पंतप्रधानांनी कोविडवर सभा घेतली. त्यात त्यांनी इलाज सांगितला. त्यावेळी देशातील राज्यांचे सर्व मुख्यमंत्री होते. फक्त पाच मुख्यमंत्र्यांना बोलायला दिले. मी मात्र आयपीएल बघत असल्यासारखं बघत होतो. मला तिथे बोलायचं नव्हतं. पाचही जण बोलले. त्यानंतर समारोप करताना पंतप्रधान दिशा दाखवतात. पण त्यांनी अचानक युद्ध सुरू केलं. महागाई कशी वाढतेय हे सांगितलं. त्यानंतर लगेच कोविडवर उपाय सांगितला. म्हणे तुमच्या राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर कमी करा. पण ते बाकी जीएसटीवर बोलले नाहीत. ते देण्याबाबतही बोलले नाहीत. मात्र भाजपवाल्यांना मुंबई फक्त ओरबडण्यासारखी हवी आहे. आम्हाला ओरबडण्यासाठी नको. आम्ही प्रत्येक आपत्तीत संकटात इतरांना मदत करतो. रक्तदान करायलाही शिवसैनिक पुढे असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

25 वर्ष युतीत सडली

अनेक गोष्टी आहेत. त्या आता सांगायलाच हव्या. आता भाजपने सांगायला सुरुवात केली आहे ते हेच आहे. 25 वर्ष युतीत सडली. हो सडली. आम्ही ओळखलं नव्हतं. हे मित्रं नाही शत्रू आहे. हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यानंतर त्यांचा चेहरा भेसूर दिसतो. आता वाटतं हाच का तो आपला मित्रं ज्याला बाळासाहेबांनी जोपासलं होतं. डोक्यावर घेऊन आम्ही नाचत होतो. हाच तो. किती भयानक पद्धतीने आणि वाईट पद्धतीने अंगावर येत आहे. सामनात जे येतं ते देशाच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचं असतं. येणारच. लांडग्यांची पिल्लावळ अंगावर येते. तेव्हाही आम्ही कधी मोदींवर टीका केली का असेही ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें