Beed Lok sabha Result 2019 : प्रीतम मुंडेंचा 178920 मतांनी दणदणीत विजय

बीड लोकसभा मतदारसंघ : भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी  यांच्यात प्रमुख लढत झाली. अखेर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर 1 लाख 78 हजार 920 मतांनी दणदणीत विजय मिळवला. विकासकारणावर […]

Beed Lok sabha Result 2019 : प्रीतम मुंडेंचा 178920 मतांनी दणदणीत विजय
बीड : प्रितम मुंडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बीड लोकसभा मतदारसंघ : भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी  यांच्यात प्रमुख लढत झाली. अखेर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर 1 लाख 78 हजार 920 मतांनी दणदणीत विजय मिळवला. विकासकारणावर ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्या बीडकर जनतेच्या सुष्टशक्तीसमोर नतमस्तक, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडेंनी यावेळी दिली. बीड लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 66.6 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी वाढला. शिवाय पहिल्यांदाच जातीय समीकरण घुसल्याने या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली होती.

बीड लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाडॉ. प्रीतम मुंडे (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीबजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतर प्रा. विष्णू जाधव (VBA)पराभूत

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक

महाराष्ट्रातील राजकीय दृष्टीने मुंडे हे सर्वात मोठे नाव आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी कमान सांभाळली आहे. यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या सख्या चुलत भावंडात  लढत पाहिली जाते.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत बीड  लोकसभा मतदारसंघात केवळ 2  टक्यांनी मतदानाची आकडेवारी वाढली. दरम्यान मतदारांची संख्याही वाढल्याने एकूण मतांचा टक्का समप्रमाणात आहे.

विधानसभा 2014 आणि  2019 ची मतदानाची आकडेवारी 

विधानसभा   2014       2019

गेवराई –      66.1          67. 20

माजलगाव-   64.30        66.47

बीड:          60       62.72

आष्टी-       64. 05      65.86

केज-       64.35        66.99

परळी-       65. 10      67.13

2019 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 28 हजार 339 मतदारांपैकी 13 लाख 48  हजार 473  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात केवळ 2 टक्यांनी वाढ झाली. गेवराई  विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त तर बीड मतदारसंघात कमी मतदान झालं.

यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य, कोणाकोणाच्या सभा?

महाराष्ट्राच्या भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव होतं. 2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांची सभा लक्षवेधी ठरली होती. मात्र यंदा भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता कोणीही बडा नेता बीडमध्ये आला नाही. प्रचाराची पूर्ण कमान पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघी बहिणींनीच सांभाळली होती.

दुसरीकडे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांनी इथं कंबर कसली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांनी रणशिंग फुंकले होते. यादरम्यान बीड जिल्ह्यात शरद पवार यांच्या तीन सभा झाल्या.  भाजपकडून रस्ते आणि विविध विकास केल्याचा दावा करण्यात येत होता, तर राष्ट्रवादीकडून वाढलेली बेरोजगारी, ऊसतोड मजुरांचे हाल, स्थलांतर, यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यात येत होता.

तिकडे वंचित बहुजन आघाडीनेही मोठी मुसंडी मारली होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांनी बीड, माजलगाव आणि अंबाजोगाईत सभा घेतल्या. सभेला प्रचंड गर्दी दिसून आली. आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादी एकाच माळेचे मणी असल्याचा घणाघात केला होता.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.