ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम, करारा जवाब देण्यासाठी दम असावा लागतो; भास्कर जाधव यांनी डिवचलं

हा पोटरकटपणा आहे. जिथे जिथे सभा होणार तिथं उत्तर देणार. ठाकरे यांची सभा उत्स्फूर्त होती.

ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम, करारा जवाब देण्यासाठी दम असावा लागतो; भास्कर जाधव यांनी डिवचलं
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 2:26 PM

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड येथे आज सभा होणार आहे. या सभेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, खेडमधील उद्धव ठाकरे यांची सभा अतिविराट झाली. त्यांच्या सभेला उत्तर द्यायचे म्हणून रामदास कदम यांच्या सांगण्यावरून शिंदे यांची सभा होत आहे. हा पोटरकटपणा आहे. जिथे जिथे सभा होणार तिथं उत्तर देणार. ठाकरे यांची सभा उत्स्फूर्त होती. शिंदे ठरवून लोकं आणून सभा घेत आहेत. आमच्या सभेचा उच्चांक मोडण्यासाठी लोकांना आमिष दाखवणार असल्याचही भास्कर जाधव यांनी म्हंटलं.

तो उच्चांक मोडू शकत नाही

शिंदे यांच्या सभेला होणारी गर्दी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या उच्चांकाचा आकडा मोडू शकत नाही. शिंदे यांच्या सभेला ५० टक्के सुद्धा उपस्थिती नसेल. रामदास कदम म्हणजे उल्लास त्यात फाल्गून मास. कोकणात म्हण आहे, वेड्याच्या हातात दिली वात आणि वेडं नाचतं सारी रात. जर वेड्या माणसाच्या हातात काकडा दिलात तर तो आग लावत फिरणार. तशी अवस्था रामदास कदम यांची आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

हे सुद्धा वाचा

करारा जवाब काय देणार?

रामदास कदम देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल त्याचा विचार न केलेला बरा. रामदास कदम यांनी बोलावल्यानंतर शिंदे यांनी यावं हे पोरटकपणाचे आहे. रामदास कदम आणि त्याच्या मुलाचे या सभेमुळे त्यांचे राजकीय उत्तर कार्य ठरलेलं आहे. ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम. करारा जवाब देण्यासाठी दम असावा लागतो. बाप माणूस एका मतदार संघापुरता असेल तर हा करारा जवाब काय देणार, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.

त्यांच्या चिरंजीवांचे अस्तित्व संपले

बेडकी फुगली तरी ती डोंगर होवू शकत नाही. रामदास कदम किंवा शिंदे गटाची बेडकी फुगेल फुगेल. लोकं निवडणुकीच्या वेळी हळूच टाचणी लावून त्याची हवा काढून फोडून टाकतील. भाजपच्या तावडीतून वाचवा हे सांगण्यासाठी शिंदे गटाचे दिग्गज मंत्री सभेला येत असावेत. रामदास कदम यांना २००९ मध्ये पराभूत केलंय. खेड दापोली मतदार संघातील त्यांच्या चिरंजीवांचे अस्तित्व संपवले, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

माझा पराभव करायचा हे माझे मतदार ठरवतील. पण रामदास कदम यांनी आपल्या मुलांचे अस्तित्व संपवले. भाजपा जिथं शिंदे गटाला उठ आणि बस म्हणेल तसं करावे लागेल. चंद्रशेखर बावनकुळे ठरवून बोलले आहेत. तीच त्यांची पक्षाची भूमिका असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हंटलं.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....