“….तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता, तोंड वर करुन”

अजित पवार यांनी आज नगर जिल्ह्यातील राहुरी (Ajit Pawar Rahuri) इथंल्या कार्यक्रमात हजर राहून, आपल्या भाषणाने हास्यकल्लोळ उडवून दिला.

....तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता, तोंड वर करुन
अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 5:10 PM

अहमदनगर : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज नगर जिल्ह्यातील राहुरी (Ajit Pawar Rahuri) इथंल्या कार्यक्रमात हजर राहून, आपल्या भाषणाने हास्यकल्लोळ उडवून दिला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनापासून ते वीजबिलापर्यंत विविध विषयांवर अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये भाष्य केलं. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पाचं (solar energy project) भूमीपूजन अजित पवारांनी केलं. यावेळी ऊर्जा विषयावर बोलताना एकच हशा पिकवला.  (Bhumi Pujan of solar energy project was by Ajit Pawar at Rahuri, Ahmednagar) 

अजित पवार म्हणाले, “सौरऊर्जा प्रकल्प सूर्यप्रकाशावर चालणार आहे. सूर्य उगवला, बटण चालू केलं की मोटर सुरु. सूर्य मावळला की मोटर बंद. ढगाळ वातावरण आलं की मोटर बंद. कारण उन्हच नाही आलं तर ते कसं काय चार्ज होणार? मी आधीच सांगतोय, उद्याच्याला ढगाळ वातावरण आलं, पावसाळ्यात वगैरे नाही तापलं तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता, तोंड वर करुन. इथं चालना काय..तर ते सूर्य असेल तरच चालणार हे लक्षात ठेवा. त्या प्लेटवर सावली आली तरी सौरप्रकल्प चालणार नाही. तिथं झाडं-बिडं लावायला जाऊ नका” अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प आम्ही राबवतोय. गेल्या पाच वर्षात शेतीपंपाची 45 हजार कोटी थकबाकी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार वीजेच्या बाबतीत काम कसं करणार…? असा सवाल उपस्थित करत आपणही आपली वीज बील न भरण्याची मानसिकता बदलायला हवी. आम्ही थकबाकीत 50 टक्के सवलत देणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं.

VIDEO अजित पवार यांचं संपूर्ण भाषण

(Bhumi Pujan of solar energy project was by Ajit Pawar at Rahuri, Ahmednagar) 

संबंधित बातम्या 

“प्राजक्त, विकास निधीसाठी जयंतमामाची मदत घ्या नाही तर माझाच ‘मामा’ व्हायचा”

साहेबांना सोडून गेले नि अकोल्यात काय गत झाली बघा, अजित पवारांच्या पिचड पितापुत्रांना कानपिचक्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.