दिग्गजांच्या विजयानंतरची भावूक क्षणचित्रं

यंदाची महाराष्ट्र निवडणूक खूप महत्त्वाची होती. कारण या निवडणुकीत अनेक दिग्गजांची मुलं निवडणूक रिंगणात उतरली होती. त्यासाठी बरच काही पणाला लावले होते.

दिग्गजांच्या विजयानंतरची भावूक क्षणचित्रं

मुंबई : यंदाची महाराष्ट्र निवडणूक खूप महत्त्वाची होती. कारण या निवडणुकीत अनेक दिग्गजांची मुलं निवडणूक रिंगणात उतरली होती. त्यासाठी बरच काही पणाला लावले होते. पण काही मिळवले तर काहींनी गमवले. मात्र यामधील जे विजयी झालेत त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर (big leader photo viral on social media) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे, शरद पवार यांचा नातू रोहित पवार, गोपिनाथ मुंडेंचा पुतण्या धनंजय मुंडे आणि डी वाय पाटील यांचा नातू ऋतुराज पाटील यांचे काही फोटो सोशल मीडियावर ट्रेंड (big leader photo viral on social media) होत आहेत.

धीरज देशमुख हे आपल्या वडिलांच्या फोटो समोर आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. आदित्य़ ठाकरे हे वडिलांना मिठी मारतानाचा फोटो, तर त्यामागे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसत आहे. रोहित पवार यांचा फेटा बांधून शिंदेंनी स्वागत केले. ऋतुराज पाटील यांचा विजयी जल्लोष करतानाचा फोटो, तसेच धनंजय मुंडे यांचा आत्या सोबतचा भावनिक फोट सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले होते. यामध्ये रोहित पवार यांची लढत सर्वात महत्वपूर्ण झाली. त्यांनी थेट भाजपचे वरिष्ठ नेते आणि पालकमंत्री राम शिंदेंच्या गडावर कब्जा मिळवत विजय मिळवला. तर धीरज देशमुख यांनी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरुन विजय मिळवलाय.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI