मुख्यमंत्र्यांची पडळकरांना मोठी ऑफर होती, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना मोठा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर पडळकर 4 दिवस गप्प बसले. मात्र, सांगलीत येऊन त्यांनी वेगळी भूमिका घेत आपली उमेदवारी जाहीर केल्याचा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील सांगली येथे आयोजित धनगर समाजबांधव मेळाव्यात बोलत होते. गोपीचंद पडळकर यांच्यासमोर मुख्यमंत्री […]

मुख्यमंत्र्यांची पडळकरांना मोठी ऑफर होती, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना मोठा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर पडळकर 4 दिवस गप्प बसले. मात्र, सांगलीत येऊन त्यांनी वेगळी भूमिका घेत आपली उमेदवारी जाहीर केल्याचा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील सांगली येथे आयोजित धनगर समाजबांधव मेळाव्यात बोलत होते.

गोपीचंद पडळकर यांच्यासमोर मुख्यमंत्री फडणवीसांनी लोकसभेच्या उमेदवारीपेक्षाही मोठा प्रस्ताव ठेवला होता, असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे आहेत, फक्त हेच बघू नका. भाजपने धनगर समाजाला किती न्याय दिला याचाही विचार करा. सांगलीच्या महापौर संगिता खोत, जलसंवर्धन मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनाही भाजपने न्याय दिला आहे.’

जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने कधीही आपल्या स्वयंसेवकाला आणि कार्यकर्त्याला जात-पात शिकवली नाही, असेही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘शरद पवारांनी भाजपविषयी गैरसमज पसरवले होते. त्यामुळे खूप काळ मराठा समाज भाजपपासून दूर होता. मात्र, मराठा, धनगर समाजाबरोबर सर्व जातीचे लोक आत्ता भाजपसोबत आले आहेत.’

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.