Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

पोरकी लेक, यशस्वी अभिनेत्री आणि पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता यांचा प्रवास अद्भुत असाच आहे. ब्राह्मण घराण्यात जन्म. आयुष्यभर ब्राह्मणविरोधी राजकारण. त्यानंतरही ज्योतिषावर प्रचंड विश्वास. अशा अनेक विरोधाभासांनी जयललिता यांचे आयुष्य व्यापलेले आहे. त्यांचा राजकारणातला पैस भरून काढणे त्याच्यानंतर अजून तरी तामिळनाडूनमध्ये कोणाला जमले नाही. सतत वादात राहूनही जयललिता यांच्यावरचे जनतेचे प्रेम शेवटपर्यंत कमी झाले नाही. ही त्यांची राजकीय पोचपावती म्हणावी लागेल.

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास...!
जयललिता.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 5:50 PM

नाशिकः तामिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) दिवंगत जयललिता (Jayalalithaa) यांची आज जयंती. 24 फेब्रुवारी 1948 रोजी एका अय्यर ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मात्र, त्यांनी ब्राह्मणविरोधासाठी राजकारणात आलेल्या अण्णा द्रमुक अर्थातच ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कड़गम पक्षाचे नेतृत्व केले. हे त्यांच्या कारकीर्दीचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. जयललिता यांनी जवळपास पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले. तर दुसरीकडे तेलगू, कन्नड, हिंदी, इंग्रजी या चित्रपटात अभिनेत्री (actress) म्हणून कारकीर्द गाजवली. चित्रपटामुळेच त्या एम.जी. रामचंद्रन यांच्या जवळ आल्या आणि तिथूनच 1982 मध्ये राजकारणात पाऊल ठेवले. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी जयललितांच्या वडिलांनी जग सोडल्यामुळे त्या पोरक्या झाल्या. कर्नाटकातल्या मेलुरकोट या छोटा गावातून आलेल्या. त्यानंतर बेंगळुरू आणि तमिळ सिनेमात चाचपडत-चाचपडत सुरुवात करणारी एक मुलगी, एका दिवशी राजकीय इतिहास निर्माण करेल, असे कोणाही राजकीय पंडिताला वाटले नसेल.

यशस्वी अभिनेत्री

जयललिता यांनी शाळेत असतानाच चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यांनी 1961 मध्ये पहिला चित्रपट केला. तो इंग्रजी होता. त्याचे नाव होते ‘एपिलस’. वयाच्या पंधराव्या वर्षी कन्नड चित्रपटातून प्रमुख भूमिका करायला सुरुवात केली. त्यांचा कन्नड भाषेतला पहिला चित्रपट होता ‘चिन्नाडा गोम्बे’. जो 1964 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी तमिळ चित्रपट सृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. त्या काळात स्कर्ट घालून भूमिका करणारी पहिली अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. तमिळमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीधर यांच्या ‘वेन्नीरादई’ चित्रपटातून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. जवळपास 300 चित्रपट केले. तमिळ, तेलगू, कन्नड, इंग्रजी, हिंदी चित्रपटात काम केले. धर्मेंद्रसह अनेक अभिनेत्यांसोबत काम केले. मात्र, त्यांनी जास्तीत जास्त चित्रपट हे शिवाजी गणेशन आणि एम. जी. रामचंद्रन यांच्यासोबतच केले. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. या चित्रपटामुळेच त्यांची ‘एमजीआर’ यांच्यासोबत ओळख झाली. त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. तिथूनच राजकीय कारकीर्द सुरू झाली. दोघांमध्ये राजकीय कारणामुळे वितुष्टही निर्माण झाले. मात्र, त्यांच्यावरचे जयललिता यांचे प्रेम तसुभरही कमी झाले नाही, पण त्यांच्यासोबत सहजीवन व्यतित करणे त्यांना जमले नाही.

गाजलेली शपथ

राजकारणात उतरल्यानंतर त्यांना अपेक्षेप्रमाणे एम. जी. रामचंद्रन यांनी संधी दिली. पक्षाचा प्रोपोगंडा सचिव, त्यानंतर राज्यसभेची खासदारकी, आमदारकी अशी नाना पदे भूषवली. मात्र, या दोघांमध्ये पक्षांतर्गत विरोधकांनी फूट पाडली. त्यातच 1984 मध्ये एम. जी. रामचंद्रन गेले. त्यानंतर अण्णा द्रमुकचे दोन तुकडे झाले. एकीकडे एम. जी. रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी, तर दुसरी बाजू जयललिता यांनी सांभाळली. त्यांनी स्वतःला एमजीआर यांचा राजकीय उत्तराधिकारी घोषित केले. त्यांच्या पक्षाने 1989 मध्ये विधानसभेच्या 27 जागा मिळवल्या. त्या विरोधी पक्षनेत्या झाल्या. 25 मार्च 1989 रोजी विधानसभेत जोरदार हंगामा झाला. त्यात विरोधकांनी जयललिता यांची साडी फाडली. हे सारे त्यांनी बाहेर माध्यमांसमोर येऊन सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतरच विधानसभेत पाय ठेवेन अशी शपथ घेतली. ती त्यांनी पूर्णही केली. त्यानंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला होता.

वादग्रस्त कारकीर्द

जयललिता यांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यांनी एकीकडे कल्याणकारी घोषणा केल्या. महिला सबलीकरणाला प्रोत्साहन दिले. मात्र, दुसरीकडे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 1988 मध्ये त्यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर बेकायदा संपत्तीप्रकरणी 1996 मध्ये त्यांच्यावर खटला चालला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध केले. त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजेच 2014 मध्येही भ्रष्ट्राचार आणि बेकायदा संपत्तीप्रकरणी त्यांच्यावर खटला चालला. यातही त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध केले. त्यांनी केलेल्या साडी आणि सँडल खरेदीची अजूनही चर्चा होते.

हिरवा रंग प्रिय

जललिता यांनी दत्तक पुत्र सुधाकर यांचे चेन्नईमध्ये लग्न केले. 7 डिसेंबर 1995 मध्ये झालेला हा शाही विवाह सोहळा चर्चेत राहिला. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चले. 50 एकरवर मंडप उभारला. तर दीड लाख पाहुण्यांनी हजेरी लावल्याचे बोलले जाते. जयललिता यांचा ज्योतिषावर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला होता. त्यांना हिरवा रंग शुभ म्हणून सांगण्यात आला होता. त्यामुळे त्या सर्व वस्तू हिरव्या रंगाच्या वापरण्यासाठी प्राधान्य द्यायच्या.

पुराची थलाइवी

जयललिता यांनी मुख्यमंत्री असताना अवघा एक रुपयांचे मानधन घेतले. त्यामुळे त्या तामिळनाडूच्या जनतेत लोकप्रिय होत्या. 5 डिसेंबर 2016 रोजी कार्डिक अॅटॅकने वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची जनतेत अम्मा अशी ओळख होती. ही ओळख निर्माण करण्यात जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांचेही मोठे योगदान होते. जयललिता यांना पुराची थलाइवी म्हंटले जायचे. त्याचा अर्थ होता क्रांतिकारी नेता. त्यांचे उभे आयुष्य पाहता, या दोन्ही उपमा त्यांना सार्थ लागू पडतात. ब्राह्मण घराण्यात जन्म. आयुष्यभर ब्राह्मणविरोधी राजकारण आणि त्यातही ज्योतिषावर असलेला प्रचंड विश्वास. अशा अनेक विरोधाभासांनी जयललिता यांचे आयुष्य व्यापलेले आहे. त्यांचा राजकारणातला पैस भरून काढणे त्याच्यानंतर अजून तरी तामिळनाडूनमध्ये कोणाला जमले नाही. सतत वादात राहूनही जयललिता  यांच्यावरचे जनतेचे प्रेम शेवटपर्यंत कमी झाले नाही. ही त्यांची राजकीय पोचपावतीच म्हणावी लागेल.

हिंदी चित्रपट

– मनमौजी (1962)

– इज्जत (1968)

तमिळ चित्रपट…

– वेनिरा आदै (1965)

– अयिरातिल ओरुवन् (1965)

– चन्द्रोदयम् (1966)

– गौरी कल्याणम् (1966)

– मेज़र चन्द्रकान्त (1966)

तेलगू चित्रपट…

– कथानायकुनी कथ (1965)

– मनुषुलू ममतलू (1965)

– आमॆ ऎवरु? (1966)

– आस्तिपरुलू (1966)

– कन्नॆपिल्ल (1966)

– गूढचारी 116 (1966)

– नवरात्री (1966)

– गोपालुडू भूपालुडू (1967)

– चिक्कडू दॊरकडू (1967)

– धनमे प्रपंचलील (1967)

– नुव्वे (1967)

– ब्रह्मचारी (1967)

– सुखदुःखालू (1967)

– अदृष्टवंतुलू (1968)

– कोयंबत्तुरु खैदी (1968)

– तिक्क शंकरय्य (1968)

– दोपिडी दॊंगलू (1968)

– निलुवू दोपिडी (1968)

– पूलपिल्ल (1968)

– पॆळ्ळंटे भयं (1968)

– पोस्टुमन् राजू (1968)

– बाग्दाद् गजदॊंग (1968)

– श्रीरामकथ (1968)

– आदर्श कुटुंबं (1969)

– कथानायकुडू (1969)

– कदलडू वदलडू (1969)

– कॊंडवीटी सिंह (1969)

– पंच कळ्याणी दॊंगल राणी (1969)

– अलिबाबा 40 दॊंगलू (1970)

– कोटीश्वरुडू (1970)

– गंडिकोट रहस्यं (1970)

– मेमे मॊनगाळ्लं (1971)

– श्रीकृष्ण विजयं (1971)

– श्रीकृष्णसत्य (1971)

– भार्याबिड्डलू (1972)

– डॉक्टर् बाबू (1973)

– देवुडम्म (1973)

– देवुडू चेसिन मनुषुलू (1973)

– लोकं चुट्टीन वीरुडू (1973)

इतर बातम्याः

मंत्री नवाब मलिकांच्या घरी सरकारी पाहुणे आलेच, पहाटेपासून ईडी चौकशी सुरू; नेमके प्रकरण काय?

Birth Anniversary | गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे, राजकारण्यांना घाम फोडणारे, शूर शहीद कामटे!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.