Birthday Special | पवारांनी तिकीट दिलं, पण राष्ट्रवादीला तोंडावर पाडलं, नमिता मुंदडा यांची डॅशिंग कारकीर्द

विधिमंडळात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नमिता मुंदडा यांचं अभिनंदन केलं. (BJP Beed MLA Namita Mundada)

Birthday Special | पवारांनी तिकीट दिलं, पण राष्ट्रवादीला तोंडावर पाडलं, नमिता मुंदडा यांची डॅशिंग कारकीर्द

मुंबई : बीडमधील केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचा आज (4 मार्च) वाढदिवस. दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या सूनबाई असलेल्या नमिता यांची राजकीय कारकीर्द नुकतीच सुरु झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकांसाठी नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर केली होती, परंतु बंडखोरी करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या डॅशिंग आमदार नमिता मुंदडा यांच्या राजकीय कारकीर्दीवर एक नजर. (Birthday Special BJP Beed Kaij MLA Namita Mundada Political Career)

गेल्या वर्षी गर्भवती असतानाही नमिता मुंदडा आठव्या महिन्यात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावत असत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंदडा पहिल्या दिवसापासून उपस्थित राहायच्या. यंदाही विधिमंडळात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं.

कोण आहेत नमिता मुंदडा ?

नमिता मुंदडा या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. शरद पवारांनी बीडमध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या विधानसभा उमेदवारांमध्ये मुंदडा यांचा समावेश होता. परंतु ऐनवेळी नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की पवारांवर आली होती.

– नमिता मुंदडा या बीडमधील केज मतदारसंघातून भाजप आमदार

– 2014 ला भाजपच्या उमेदवार संगिता ठोंबरे यांनी 42 हजार 721 मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात नमिता मुंदडा या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या.

-नमिता मुंदडा दिवंगत विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत.

-दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा या सलग पाच वेळा केज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

-विमल मुंदडा यांनी भाजपातून आपली राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

-भाजपकडून 2 वेळा आणि राष्ट्रवादीतून 3 वेळा त्या निवडून आल्या. तसेच 9 वर्षे त्यांनी विविध खात्याचे मंत्रिपद सांभाळले.

– राष्ट्रवादीत असताना मुंदडा कुटुंबाचे वेगळे अस्तित्व होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनावणे यांच्यासोबत मुंदडा कुटुंबाचे कधीच पटले नाही. (Birthday Special BJP Beed Kaij MLA Namita Mundada Political Career)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

संबंधित बातम्या :

आठ महिन्यांच्या गर्भवती आमदार नमिता मुंदडांचा उत्साह, विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी

शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा भाजपच्या वाटेवर

(Birthday Special BJP Beed Kaij MLA Namita Mundada Political Career)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI