आठ महिन्यांच्या गर्भवती आमदार नमिता मुंदडांचा उत्साह, विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी

केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नमिता मुंदडा आपलं मातृत्व सांभाळत लोकांच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवत आहेत

आठ महिन्यांच्या गर्भवती आमदार नमिता मुंदडांचा उत्साह, विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी

मुंबई : बीडमधील भाजप आमदार नमिता मुंदडा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. गर्भवती असलेल्या नमिता मुंदडा आठव्या महिन्यातही अधिवेशनाला हजेरी लावत आहेत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंदडा पहिल्या दिवसापासून उपस्थित आहेत. (Pregnant Namita Mundada in Vidhansabha)

केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नमिता मुंदडा आपलं मातृत्व सांभाळत लोकांच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवत आहेत. महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करताना त्यांना धक्का लागणार नाही, याची काळजी सर्वच आमदार घेताना दिसत आहेत.

‘विरोधात असले तरी मतदारसंघाने निवडून दिल्यामुळे जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणं माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. गर्भधारणा हा काही आजार नव्हे, तर जीवनाचा एक भाग आहे’ अशी प्रतिक्रिया नमिता मुंदडा यांनी व्यक्त केली.

विधानसभा अधिवेशनात हजेरी लावणाऱ्या आपण पहिल्याच गर्भवती आमदार असल्याचं ऐकलं, असं नमिता मुंदडा सांगतात. ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. माझ्या मतदारसंघात असे अनेक मुद्दे आहेत जे मी सभागृहात मांडले पाहिजेत.’ असंही त्या म्हणाल्या. बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्या, ऊसतोड महिला कामगारांचं गर्भाशय काढणे, यासारखे अनेक मुद्दे गाजत आहेत. Pregnant Namita Mundada in Vidhansabha

कोण आहेत नमिता मुंदडा ?

नमिता मुंदडा या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. शरद पवारांनी बीडमध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या विधानसभा उमेदवारांमध्ये मुंदडा यांचा समावेश होता. परंतु ऐनवेळी नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की पवारांवर आली होती.

-नमिता मुंदडा दिवंगत विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत.

-दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा या सलग पाच वेळा केज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

-विमल मुंदडा यांनी भाजपातून आपली राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

-भाजपकडून 2 वेळा आणि राष्ट्रवादीतून 3 वेळा त्या निवडून आल्या. तसेच 9 वर्षे त्यांनी विविध खात्याचे मंत्रिपद सांभाळले.

– राष्ट्रवादीत असताना मुंदडा कुटुंबाचे वेगळे अस्तित्व होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनावणे यांच्यासोबत मुंदडा कुटुंबाचे कधीच पटले नाही.

– 2014 ला भाजपच्या उमेदवार संगिता ठोंबरे यांनी 42 हजार 721 मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात नमिता मुंदडा या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या.

Pregnant Namita Mundada in Vidhansabha

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *