नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश भ्रष्ट राजकारणाचा कळस : धनंजय मुंडे

जे आपल्या आईला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत ते जनतेला दिलेली आश्वासने काय पाळतील? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Namita Mundada Dhananjay Munde) यांनी केज मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय होईल असा दावा केला.

नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश भ्रष्ट राजकारणाचा कळस : धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 9:55 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर केलेल्या उमेदवाराला (Namita Mundada Dhananjay Munde) पक्षात प्रवेश देण्याची जी दुर्दैवी वेळ भाजपवर आली, ती भ्रष्ट राजकारणाचा कळस करणारी आहे, जे आपल्या आईला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत ते जनतेला दिलेली आश्वासने काय पाळतील? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Namita Mundada Dhananjay Munde) यांनी केज मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय होईल असा दावा केला.

केजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप केले. याबद्दल बोलताना मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले. आमच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही त्यांनी पक्ष सोडावा हे दुर्दैव आहे. त्यांच्या आईला पक्षाने आमदारकी, मंत्रिपद दिलं, मात्र त्यांनी लोकसभेत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार केला, असा आरोप मुंडे यांनी केला.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघात विजयाची खात्री नसल्याने त्यांनी मुंदडा यांना सोबत घेतलं आहे. मात्र त्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही, असंही धनंजय यांनी स्पष्ट केलं.

नमिता मुंदडा भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केल्यानंतरही नमिता मुंदडा (Namita Akshay Mundada BJP) यांनी भाजपात प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या विरोधाला कंटाळून आपण भाजपात जात असल्याचं मुंदडा कुटुंबाने म्हटलं आहे. दिवंगत नेत्या विमलताई मुंदडा या दोन वेळा भाजपच्या आणि तीन वेळा राष्ट्रवादीच्या आमदार होत्या, तर नऊ वर्ष त्यांच्याकडे मंत्रीपदही होतं. शरद पवारांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. पुढे त्यांचा राजकीय वारसा मुलगा अक्षय आणि सून नमिता यांनी चालवला.

या काळात मुंदडा कुटुंबीयांना कायम दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंनी कायम मुंदडा कुटुंबाला डावलल्याचा आरोप मुंदडा कुटुंबाकडून अनेकदा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी तालुकाध्यक्षांची नियुक्ती देखील पाच वर्षे रखडवल्याचं बोललं जातं. नगरपालिका असो की जिल्हा परिषद, प्रत्येक ठिकाणी मुंदडा विरुद्ध सोनवणे आणि मुंडे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.