भाजपात मोठे बदल, या 17 राज्यांसाठी नवे चेहरे

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संघटनात्मक बदल केले आहेत. पक्षाने 17 राज्यांसाठी नवे प्रभारी जाहीर केले आहेत. उत्तर प्रदेशला सर्वात जास्त तीन प्रभारी नेमण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. यापैकी 71 जागा भाजपने 2014 च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. मायावतींच्या बसपाला मोदी लाटेत खातंही उघडता आलं नव्हतं. छत्तीसगड, मध्य …

भाजपात मोठे बदल, या 17 राज्यांसाठी नवे चेहरे

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संघटनात्मक बदल केले आहेत. पक्षाने 17 राज्यांसाठी नवे प्रभारी जाहीर केले आहेत. उत्तर प्रदेशला सर्वात जास्त तीन प्रभारी नेमण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. यापैकी 71 जागा भाजपने 2014 च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. मायावतींच्या बसपाला मोदी लाटेत खातंही उघडता आलं नव्हतं.

छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भाजपने आता कंबर कसली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी संपूर्ण एनडीएला मिळूनही बहुमताचा आकडा गाठणं कठीण असल्याचं काही सर्व्हेंमधून दिसत आहे.

प्रभारींची पहिली यादी

उत्तर प्रदेश – नरोत्तम मिश्रा, दुष्यंत गौतम, गोवर्धन झाडपिया

उत्तराखंड : थावरचंद गहलोत

राजस्थान : प्रकाश जावडेकर आणि सुधांशू त्रिवेदी

पंजाब : कॅप्टन अभिमन्यू

ओदिशा : अरुण सिंह

नागालँड : नलिन कोहली

मणिपूर :  नलिन कोहली

मध्य प्रदेश : स्वतंत्रदेव सिंह, सतीश उपाध्याय

झारखंड : मंगल पांडेय

हिमाचल प्रदेश : तीरथ सिंह रावत

गुजरात : ओम प्रकाश माथूर

छत्तीसगड : अनिल जैन

आसाम : महेंद्र सिंह

आंध्र प्रदेश : मुरलीधरन

बिहार : भूपेंद्र यादव

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *