AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा”, बावनकुळे यांचं शरद पवार यांना आवाहन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हटलंय? पाहा...

जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा, बावनकुळे यांचं शरद पवार यांना आवाहन
| Updated on: Nov 14, 2022 | 1:30 PM
Share

पुणे : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने बावनकुळे यांचं निलंबन करायलाच हवं. अशा घटना होत राहतात असं बोलून चालणार नाही. आव्हाडांना आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो द्यावा. अजित पवार आणि शरद पवार आव्हाडांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल त्यांनी केलाय.

कुणी आव्हाड यांचं समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं, असंही बावनकुळे म्हणालेत.

पवार कुटुंबियांनी बारामतीमध्ये 60 वर्षे सत्ता केली. सरकार चालवलं. तर त्यांनी उपकार केले नाहीत. बारामतीत दहशत आहे. आता गेलेले शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमध्ये दहशत नव्हती. त्यांना शिंदेंचं नेतृत्व आवडलं त्यामुळे ते शिंदेंसोबत गेले, असं बावकुळे म्हणालेत.

शिंदे गट-भाजप सध्या एकत्र आहे. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूका लढवणार आहे, असंही बावनकुळेंनी सांगितलं.

गजानन कीर्तिकर यांच्या शिंदेगटात प्रवेशावरून बावनकुळे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. कीर्तिकर यांनी शिवसेनेसाठी कष्ट घेतले. सेना घराघरापर्यंत पोहचवली. मग त्यांना ठाकरेगट का सोडावा लागला? उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चार लोक उरतील, असं बावनकुळे म्हणालेत.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.