AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्येही कलह, जळगावचा उमेदवार ऐनवेळी बदलला

जळगाव : काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही आपला उमेदवार बदलला आहे. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आता आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट […]

भाजपमध्येही कलह, जळगावचा उमेदवार ऐनवेळी बदलला
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

जळगाव : काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही आपला उमेदवार बदलला आहे. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आता आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता स्मिता वाघ यांच्याही तिकीटावर खाट मारुन, उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अंतर्गत कलहामुळे उमेदवारी कापल्याचं सांगण्यात येत आहे.

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात आता उन्मेष पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात लढत होणार आहे.

विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांच्या बंडांचा फटका बसण्याची शक्यता, तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या तुलनेत स्मिता वाघ कमकुवत ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या ऐवजी चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

भाजपला जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागल्याची ही पहिलीच घटना ठरली.आधी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा सुरु होती. पण आता उन्मेष पाटलांचे नाव निश्चित झाल्याने, जळगावमधील राजकीय वातावरण बदलून गेलं आहे.

काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी विद्यमान खासदार ए टी पाटील यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला होता. ‘गिरीश महाजन यांनी माझा घात केला’, असा आरोप त्यांच्याच पक्षातील जळगावचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनी केला होता. यानंतर महाजनांनी ए.टी. पाटील यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. “मी बोललो तर त्यांची पंचाईत होईल”, असा दम महाजनांनी ए.टी. पाटलांना दिला होता. ही सर्व परिस्थिती पाहता स्मिता वाघ यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला.

संबंधित बातम्या

ए. टी. पाटील गप्प राहा, मी बोललो तर पंचाईत होईल : गिरीश महाजन 

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.