AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या बड्या नेत्याकडून टिपू सुलतान जयंतीचा जल्लोष! एमआयएम नगरसेवकाकडून जंगी स्वागत; व्हिडिओ व्हायरल

BJP Corporator Celebrates Tipu Sultan Jayanti in Dharashiv: भाजप नगरसेवकाकडून टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एमआयएम नगरसेवकाकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे.

भाजपच्या बड्या नेत्याकडून टिपू सुलतान जयंतीचा जल्लोष! एमआयएम नगरसेवकाकडून जंगी स्वागत; व्हिडिओ व्हायरल
BJP and AIMIM Corporators Share Stage at Tipu Sultan Jayanti Celebration in Dharashiv
| Updated on: Nov 21, 2026 | 10:03 PM
Share

धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या एका नगरसेवकाने टिपू सुलतान यांची जयंती साजरी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजप नगरसेवक विलास लोंढे यांनी धाराशिव शहरातील टिपू सुलतान चौकात आयोजित जयंती कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात एमआयएमचे नगरसेवक अझहर मुजावर यांनी लोंढे यांचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आणि रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजप नगरसेवकाच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील टिपू सुलतान चौकात टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक विलास लोंढे उपस्थित होते. यावेळी एमआयएमचे नगरसेवक अझहर मुजावर यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नगरसेवकांच्या या एकत्रित उपस्थितीची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून टिपू सुलतान यांच्या जयंतीवरून यापूर्वी अनेकदा राजकीय भूमिका आणि वाद समोर आले आहेत.

अशा पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकानेच जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग घेतल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात या उपस्थितीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. या कार्यक्रमातील स्वागताचा व्हिडीओ तसेच जयंती साजरी करतानाचे रिल्स नगरसेवक विलास लोंढे यांच्याकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. भाजप नगरसेवकाने टिपू सुलतान यांची जयंती साजरी केल्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावरही चर्चा रंगू लागली आहे.

भाजप आणि एमआयएम या दोन पक्षांच्या स्थानिक नगरसेवकांची एकाच कार्यक्रमातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेवर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची काय भूमिका असणार, तसेच पक्षाकडून याबाबत काही प्रतिक्रिया दिली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे पक्षीय राजकारणात टिपू सुलतान यांच्या जयंतीचा मुद्दा अनेकदा चर्चेत येत असताना, दुसरीकडे भाजप नगरसेवकाच्या या सहभागामुळे धाराशिवमधील राजकीय चर्चेला नवा विषय मिळाला आहे.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...