AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असतानासुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे (President Rule in Maharashtra), हे अतिशय दुर्दैवी आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Nov 12, 2019 | 8:12 PM
Share

मुंबई : राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असतानासुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे (President Rule in Maharashtra), हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं (Devendra Fadnavis).

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता (Maharashtra Vidhansabha Election). तरीही राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल.

राष्ट्रपती राजवटीमुळे सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होईल. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी अपेक्षा करतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन तेढ 

विधानसभा निवडणुकांमध्ये राज्याच्या जनतेने भाजप-शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं. मात्र, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना अडून बसली आणि भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हता. त्यामुळे राज्यात सत्तास्थापना खोळंबली.

राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची (President Rule in Maharashtra) शिफारस केली होती. त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करत मोहर उमटवली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महाराष्ट्राचा कारभार आता राजभवनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चालवतील. राष्ट्रपती राजवटीत कधीही कोणत्याही पक्षांकडे बहुमताची समीकरणे जमली तर तशा पत्रांसह ते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करु शकतात.

सत्तासंघर्ष कसा चालला?

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपने त्याला नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला आवताण दिलं होतं. शिवसेनेने काल रात्री राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला. मग राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला मंगळवारी रात्री 8.30 पर्यंतची मुदत दिली. मात्र त्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

राष्ट्रपती राजवटीत कसा चालणार राज्य कारभार?

  • राष्ट्रपती राजवटीत राज्यपाल राज्याचा कारभार पाहणार
  • राज्य कारभार चालवण्यासाठी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्याशी चर्चेनंतर तीन सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल.
  • हे सनदी अधिकारी राज्यपालांना सल्लागार म्हणून काम करतात.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.