भाजपसोबत 25 वर्षे काम केलं, कुणी कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?

विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी आमच्याशी गोड बोलावं, गोड राहावं, गोड हसावं. त्यांनी सरकारबाबात सकारात्मक विचार करावा, एवढ्याच शुभेच्छा आहेत. | Sanjay Raut

भाजपसोबत 25 वर्षे काम केलं, कुणी कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 11:16 AM

मुंबई: मी भाजपला विरोधी पक्षच मानत नाही, ते आमचे सहकारीच आहेत. मुळात राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. आहे. आम्ही भाजपसोबत 25 वर्षे जवळून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी शत्रुत्व असण्याचं कारण नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. (Sanjay Raut says BJP is not our enemy)

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी तुम्ही विरोधी पक्षाला मकरसंक्रांतीच्या काय शुभेच्छा द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिले.

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. भाजपा सोबत आम्ही पंचवीस वर्ष काम केले आहे. आम्ही त्यांना शत्रू मानायला तयार नाही. जरी विरोधी पक्षात असले तरी ते आमचेच सहकारी आहे. मकरसंक्रांतींच्या दिवशी मी एवढीच अपेक्षा करतो की, विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी आमच्याशी गोड बोलावं, गोड राहावं, गोड हसावं. त्यांनी सरकारबाबात सकारात्मक विचार करावा, एवढ्याच शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असेही त्यांनी म्हटले.

खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

(Sanjay Raut says BJP is not our enemy)

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.