AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागून पाळीव कुत्र्यासारखे फिरता’, ठाकरेंवर हल्लाबोल

"एकनाथ शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होता त्याच काय झालं?. आदित्य ठाकरे केवळ वडिलांसारख्या सुक्या धमक्या देतो का? वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्य मागे माजी आमदार लागणार" अशी टीका नितेश राणेंनी केली.

'मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागून पाळीव कुत्र्यासारखे फिरता', ठाकरेंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
| Updated on: Oct 25, 2024 | 12:43 PM
Share

“महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटतं आहेत, त्यातल्या किती जगा काँग्रेसला द्यायच्या ठरल्या होत्या?. स्वतःच्या मित्र पक्षाला भीक न घालण्याचे काम उबाठाकडून होतय. दिल्लीत ज्या जागांची चर्चा प्रलंबित होती, त्या जागा उद्धव ठाकरे जाहीर करुन झाले आहेत. जो उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचा झाला नाही तॊ काँग्रेस आणि शरद पवार गटाचा होईल का?” अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली. “बेईमानी शिवाय उद्धव ठाकरेंनी काही केलं नाही. काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरेने भुईसपाट केलं आहे, संपवून टाकलं आहे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेसला झुकते माप का नाही” असा मुद्दा नितेश राणे यांनी उपस्थित केला.

“आज उद्धव ठाकरेला भाजपाची आठवण आली असेल, तेव्हा 120 जागा मिळाल्या. पण आता नाक रगडून 100 मिळत नाहीत. काँग्रेसने विचार करावा उद्धव ठाकरेंने कोकणात राष्ट्रीय काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एकनाथ शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होता त्याच काय झालं?. आदित्य ठाकरे केवळ वडिलांसारख्या सुक्या धमक्या देतो का? वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्य मागे माजी आमदार लागणार” अशी टीका नितेश राणेंनी केली.

राहुल गांधींना मातोश्रीचा पत्ता माहितीय का?

“बाळासाहेब ठाकरे असताना, सगळे मोठे नेते मातोश्रीवर यायचे. 10 जनपथवरुन राहुल गांधी मातोश्रीवर आलाय का? त्याला मातोश्रीचा पत्ता माहित आहे का?. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागून पाळीव कुत्र्यासारखे फिरत आहेत” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Follow Us
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?